Type Here to Get Search Results !

सर्व सामान्य माणसांच्या मनात घर केल्यामुळेच कै. माजी आमदार बाबुरावजी आडसकर कायमस्मरणात राहतील.-ह.भ.प.महंत महादेव महाराज बोराडे शास्त्री.

 सर्व सामान्य माणसांच्या मनात घर केल्यामुळेच कै. माजी आमदार बाबुरावजी आडसकर कायमस्मरणात राहतील.-ह.भ.प.महंत महादेव महाराज बोराडे शास्त्री.




केज/प्रतिनिधी


आठ वर्षांनंतरही लोकांचे डोळे ओले होतात माणसे आठवणींनी सदगदीत होतात.खरा लोकनेता कसा असतो याचे मुर्तीमंत उदाहरण म्हणजे माजी आमदार कै.बाबुराव आडसकर तात्यांचे काम या केज तालुक्यात कायम स्मरणात राहील असे प्रतिपादन ह.भ.प.महंत महादेव महाराज बोराडे शास्त्री,पावनधाम यांनी केले.ते आडस येथील कै. माजी आमदार बाबुरावजी आडसकर यांच्या आठव्या पुण्यस्मरण कार्यक्रमात सुश्राव्य किर्तनात बोलत होते.या कार्यक्रमात ह.भ.प.महंत महादेव बोराडे महाराज म्हणाले की,तात्यांना अध्यात्माची ही ओढ होती.निष्कलंक चारित्र्य,सर्व सामान्य माणसांवर ठेवलेला विश्वास,संयम,धाडस या गुणांमुळेच ते आजही घरोघरी चर्चेत आहेत.

या प्रसंगी रमेशराव आडसकर यांनी तात्यांच्या विचारावरच पुढेही मार्ग क्रमण करुन सर्व सामान्य जनता हीच माझी खरी कमाई असे सांगितले.या प्रसंगी केज,माजलगाव, अंबाजोगाई,वडवणी, किल्लेधारुर परिसरातील शेतकरी,शेतमजूर, कार्यकर्ते उपस्थित होते.

राजकीय क्षेत्रातील राजाभाऊ मुंडे,शिवाजी रांजवण,सोमनाथ बडे, राजकिशोर पापा मोदी, आदित्य दादा पाटील, राजेसाहेब देशमुख,राहुल सोनवणे,डॉ.आनंदगावकर,शेषेराव फावडे,केज नगर पंचायतच्या नगराध्यक्षा सौ.सीताताई बनसोड, हारुणभाई ईनामदार, पृथ्वीराज साठे,रमेश तात्या गालफाडे,भारत पिंगळे,हनुमंतराव मोरे, दत्ता आबा पाटील,अॕड. बालासाहेब इंगळे, डॉ.नयनाताई सिरसट, डॉ.अशोकथोरात,रमाकांत बापु मुंडे आदी उपस्थित होते.तसेच या पुण्यस्मरण कार्यक्रमाला पंचक्रोशी तील आडसकर परिवारा वर प्रेम असलेले नागरीक मोठ्या संख्येत उपस्थीत होते.

Post a Comment

0 Comments