Type Here to Get Search Results !

महिलांच्या विविध प्रश्‍नावर सामाजिक संस्था व संघटनाने उठवला आवाज

 महिलांच्या विविध प्रश्‍नावर  सामाजिक संस्था व संघटनाने उठवला आवाज



बीड/प्रतिनिधी 


विविध सामाजिक संस्था समाजाच्या तळागाळातील महिला विविध प्रश्‍नावर सातत्याने लढत आहेत. एकल महिला संघटना वंचीत पीडित महिलांच्या प्रश्‍नावर भांडत आहे. परंतू याकडे कोणीच लक्ष देत नाही, यामुळे विविध महिला संस्था/संघटना आक्रमक झाल्या असून त्यांनी स्वातंत्र्यदिनी तीव्र आंदोलन छेडण्याचा ईशारा दिला आहे.

या बाबत बोलताना एकल महिला संघटनेच्या रूक्मीणी नागापुरे म्हणाल्या, गेल्या दहा वर्षापासून आम्ही समााजाच्या विविध घटकातील वंचीत, उपेक्षीत, निराधार, एकल महिलांच्या न्यायासाठी लढत आहोत. आजपर्यंत अनेकदा विविध शासकीय कार्यालयातील अधिकारी, जनसेवक, लोकप्रतिनिधी यांना निवेदन दिले. परंतू कोणीही महिलांचे प्रश्‍न गांभीर्याने घेत नाही. देशाला स्वातंत्र्य मिळून उद्या ७६ वर्षे पुर्ण होत आहेत. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव देखील साजरा झाला आहे. तरी देखील वंचीत, उपेक्षीत, पीडीत, एचआयव्ही बाधीत आणि अत्याचारीत महिला आपले हक्क आणि न्यायापासून वंचीत आहेत. देशाला ज्या दिवशी स्वातंत्र्य मिळाले त्या दिवशी आम्ही आमच्या काही मागण्या मांडत आहोत, त्या पुढीलप्रमाणे आहेत. यात १५ ऑगस्ट रोजी महिलांची स्वतंत्र ग्रामसभा घ्यावी, संजय गांधी- श्रावणबाळ योजनेच्या रखडलेल्या प्रस्तावांना तात्काळ मंजूरी द्यावी, जिल्ह्यातील महिला, बालके, लहान मुले- मुली यांच्यावरील हींसा व ईतर अत्याचार थांबवावेत, सामाजिक संघटना व संस्थांच्या प्रतिनिधींना विशाखा समितीवर सदस्य म्हणून घ्यावे, मसनवट्यात राहणार्‍या मसनजोगी समाजाला आधार कार्ड, जात प्रमाणपत्र, मतदान कार्ड, राशन कार्ड व वास्तव्यास जागा द्यावी, प्रत्येक गावात ग्राम सभेत महिलेची स्वतंत्र विवाह नोंदणी करावी व ग्रामसभेत त्याचे वाचन व्हावे, यासह विविध मागण्या सोडवाव्यात अशी मागणी एकल महिला संघटना बीड, धर्मराज बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, गोपालनंद सेवाभावी संस्था, क्रांती महिला असंघटित कामगार युनियन महाराष्ट्र राज्य, प्रेरणा महिला  संघटनेच्या प्रतिनिधी यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments