Type Here to Get Search Results !

जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा तरनळी शाळेत शाळा व्यवस्थापन समितीची निवड.

 जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा तरनळी शाळेत शाळा व्यवस्थापन समितीची निवड.     


                                       


केज /प्रतिनिधी 


जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा तरनळी या शाळेत दि.१० ऑगस्ट २०२४ शनिवार रोजी पालक सभा घेऊन शाळा व्यवस्थापन समिती निवडण्यात आली. कृष्णा बांगर,सौ.सिमा मोहिते, सुहास सरवदे ,सौ. विजयमाला सानप,किसन नागरगोजे,श्रीरामखामकर,संपत्ती सरवदे,सतिश सानप यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली. शाळा व्यवस्थापन समिती सदस्यातून पालक सदस्य संपत्ती सरवदेयांचीअध्यक्ष पदी निवड करण्यातआली व सौ.सिमा मोहिते यांची उपाध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आली. शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष,उपाध्यक्ष तसेच सर्व सदस्यांचे जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा तरनळी शाळेचे मुख्याध्यापक श्री. राजाभाऊ कदम व सर्व शिक्षक,शिक्षिकांच्या वतीने मनःपूर्वक स्वागत करण्यात आले.यावेळी शाळा व्यवस्थापन समिती ने शाळेस सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. श्री.बापुसाहेब गायकवाड यांनी शाळा व्यवस्थापन समितीचे आभार मानले व बैठक संपन्न झाली.

Post a Comment

0 Comments