Type Here to Get Search Results !

रामटेक येथे प्रबोधनकार भीम शाहीर प्रदीप कडबे यांच्या गायनाच्या माध्यमा तून समाज प्रबोधन व भव्य जाहीर सत्कार.

 रामटेक येथे प्रबोधनकार भीम शाहीर प्रदीप कडबे यांच्या गायनाच्या माध्यमा तून समाज प्रबोधन व भव्य जाहीर सत्कार. 



नागपुर/प्रतिनिधी 


रामटेक येथे ज्ञानगंगा सांस्कृतिक लोककला महिला संस्था,नियोजित लोककला सेवा संस्था धापेवाडा यांच्या संयुक्त विद्यमाने लोक कलावंता चा भव्य मेळावा दिनांक शुक्रवार २३ आॕगष्ट२०२४ रोजी सकाळी दहा ते सहा पर्यंत गंगाभवन भारतरत्न डॉ.आंबेडकरचौकरामटेक येथे लोक कलावंताच्या मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला.या कार्यक्रमाचे उद्घाटकरामटेकलोकसभा क्षेत्राचे माजी खासदार प्रकाश भाऊ जाधव, कार्यक्रमाचे अध्यक्ष नरेश बर्वे,सामाजिक कार्यकर्ता, कृषी उत्पन्न बाजारसमिती सभापती,सचिन भाऊ किरपान,ज्ञानगंगा सांस्कृतिक लोककला महिला संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष,बाबाराव दुपारे, संस्थेच्या सचिव निशा खडसे,शाहीर गणेश मेश्राम,युवा प्रबोधनकार भीम शाहीर प्रदीप कडबे, विदर्भअध्यक्ष संजय काळे जिल्हाध्यक्ष सुधाकर मुडेकर,प्रभाकरजी नागमोते,श्रावणजी क्षीरसागर,रामाजी धुर्वे, विजयजी गजबे,शाहीर राजेंद्र बावनकुळे,अशोक लोणारे,शाहीर शंकरजी भोंगेकर यांच्या हस्ते महा पुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.याप्रसंगी रामटेक तालुक्यातील किरणापुर येथील प्रबोधन कार भीम शाहीर प्रदीप बागवान कडबे यांनी साहित्यसम्राट लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांचे विज्ञानवादी विचार मांडून समाज प्रबोधन गीते सादर केली.यावेळीत्यांचाजाहीर सत्कार करण्यात आला. सर्वश्री शाहीर गणेश मेश्राम,शाहीर शंकर भोंगेकर,रवींद्र मेश्राम, शाहीर रमेश रामटेके, शाहीर युवराज अडकणे, भाऊराव राऊत,ललित गौरेकर,भाऊराव मेश्राम, माधुरी कळस्कर,सविता महल्ले,सविता गाठकीने, शाहिरा संगीता जांभुळकर,अनिल बेले, पुष्पा निंबुळकर,आशा जगताप,सुनिता शेलारे, सुलोचना नरुले,विलास सरोदे,अर्चना कळंबे, प्रभाकर नागमोते,श्रावण क्षीरसागर,रामजी धुर्वे, ज्ञानेश्वर पाटील,निलेश गायकवाड,विलास सरोदे, राकेश जांभुळकर,राजेश लांडे,भीम शाहीर प्रदीप कडबे,कार्यक्रमाचे आयोजक राष्ट्रीय अध्यक्ष, बाबारावजी दुपारे आदी मान्यवर उपस्थीत होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेच्या सचिव निशा खडसे यांनी केले तर कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन विदर्भ संघटक पुष्पाताई निंबुळकर यांनी केले. यावेळी रसिक व मोठ्या संख्येने शाहीर कलाकार उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments