Type Here to Get Search Results !

स्वामी विवेकानंद विद्या मंदीर शाळेतील श्रेया गुंड हिची जिल्हास्तरीय योगा स्पर्धेसाठी निवड.

 स्वामी विवेकानंद विद्या मंदीर शाळेतील श्रेया गुंड हिची जिल्हास्तरीय योगा स्पर्धेसाठी निवड.



केज/प्रतिनिधी  


जीवन विकास शिक्षण मंडळ केज संचलित, स्वामी विवेकानंद विद्या मंदिर माध्यमिक विभाग या शाळेची विद्यार्थीनी कु. श्रेया विनोद गुंड हीने केज तालुकास्तरीय योगास्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला. तसेच जिल्हास्तरीय योगा स्पर्धेसाठी ती केज तालुक्याचे नेतृत्व करणार आहे.तेंव्हा तिच्या या यशा बद्दल जीवन विकास शिक्षण मंडळ केज या संस्थेचे अध्यक्ष श्री. अंकुशरावजी इंगळे, सचिव श्री.गिन्यानदेव गदळे,शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती शिवनंदा मुळे तसेच शाळे तील सर्व शिक्षकवृंद आदीं नी हार्दिक अभिनंदन केले पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Post a Comment

0 Comments