Type Here to Get Search Results !

केज उपजिल्हा रुग्णालयात जागतिक स्तनपान सप्ताह साजरा

 केज उपजिल्हा रुग्णालयात जागतिक स्तनपान सप्ताह साजरा


.


केज/प्रतिनिधी


केज येथील उपजिल्हा रुग्णालयात जागतिक स्तनपान सप्ताह साजरा करण्यात आला आहे. 

दिनांक ३ ऑगस्ट २०२४ रोजी जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला.स्तनदा मातांना यावेळी मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.केंद्रे यांनी स्तनपान या विषया वर मार्गदर्शन केले.आहार तज्ञ डाॕ.सुलक्षणा पाटील यांनी आई व बाळासाठी स्तनपानाचे महत्त्व सांगितले.स्तनदा मातेच्या आहाराविषयी मार्गदर्शन केले.समुपदेशक सीता गिरी यांनी स्तनपानाच्या वेगवेगळ्या पद्धती विषयी मार्गदर्शन केले व श्रीमती जगताप यांनी स्तनपाना विषयी मार्गदर्शन केले. चित्रफित,चार्टच्या माध्यमा तून मातांना मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमास स्तनदा मातांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Post a Comment

0 Comments