Type Here to Get Search Results !

मांजरसुंबा येथील शिखर पब्लिक स्कूलमध्ये भारतीय स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा

 मांजरसुंबा येथील शिखर पब्लिक स्कूलमध्ये भारतीय स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा




बीड/ प्रतिनिधी


मांजरसुंबा येथील शिखर पब्लिक स्कूल मध्ये भारतीय स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात विविध उपक्रम साजरा करण्यात आला. 

यावेळी ध्वजारोहण शेकापचे राज्य कार्यकारणी सदस्य तथा क्रांतिवीरचे संपादक भाई मोहन गुंड यांच्या हस्ते करण्यात आले. तर प्रमुख अतिथि म्हणून शाळेचे सचिव ॲड. नितीन रांजवन ॲड. निखिल बचुटे,भाई अशोक रोडे, नेकनूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पवार मॅडम, आशा चौरे मॅडम तर या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ॲड. बळवंत कदम यांची प्रमुख उपस्थिती होती. 

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेच्या प्राचार्य कदम मॅडम यांनी केले तर सूत्रसंचालन सय्यद मॅडम यांनी केले उपस्थितांचे आभार जाधव मॅडम यांनी मानले. ध्वजारोहणाच्या कार्यक्रमास पालकांची व नागरिकांची संख्या मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments