Type Here to Get Search Results !

गटविकास अधिकारी समृद्धी मोसमी लालाजी दिवाने- काळे यांच्यासमोर कर्मचाऱ्यांची दादागिरी ग्रामसेवकांसह रोजगार सेवकांचा ताफा उपोषणस्थळी, उपोषणकर्त्यावर टाकला दबाव. उपोषण कर्त्यांनी मांडल्या व्यथा, जबरदस्तीने उपोषण सोडले,सात दिवसाचा अल्टिमेटम.

 गटविकास अधिकारी समृद्धी मोसमी लालाजी दिवाने- काळे यांच्यासमोर कर्मचाऱ्यांची दादागिरी


ग्रामसेवकांसह रोजगार सेवकांचा ताफा उपोषणस्थळी,

उपोषणकर्त्यावर टाकला दबाव. 



उपोषण कर्त्यांनी मांडल्या व्यथा, जबरदस्तीने उपोषण सोडले,सात दिवसाचा अल्टिमेटम.





केज/प्रतिनिधी


केज पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी श्रीमती समृद्धी मोसमी लालाजी दिवाने-काळे यांच्यासमोर कर्मचाऱ्यांनी उपोषणकर्त्यावर दादागिरी केली असताना गटविकास अधिकारी गप्प का राहिल्या ? असा सवाल उपस्थित नागरिकांनी केला आहे.ग्रामविकास अधिकाऱ्यांसह रोजगार सेवकांचा ताफा उपोषण स्थळी दाखल होताच उपोषणकर्त्यावर दबाव टाकून उपोषण सोडवल्याची उपस्थित नागरिकांतून चर्चा ऐकण्यास मिळत आहे. 

उपोषणकर्त्यांनी गट विकास अधिकारी यांच्यासमोर त्यांच्या व्यथा मांडत असताना उपस्थित ग्रामविकास अधिकारी व रोजगार सेवक मध्येच बोलून उपोषणकर्त्याचा आवाज दाबत होते.या उलट गटविकास अधिकारी मॕडम यांनी कर्मचाऱ्यांना गप्प करुन उपोषणकर्त्यांचे म्हणणे ऐकून घेणे अपेक्षित होते परंतु गटविकासअधिकारी  मॕडम उपोषणकर्त्यांनाच गप्प करत होत्या असेचित्र उपोषणस्थळी पाहावयास मिळाले.चौकशी समिती गठीत करून सात दिवसात अहवाल मिळावा असा अल्टिमेटम उपोषणार्थींनी दिला आहे परंतु सात दिवसाचा गट विकास अधिकारी यांनी अल्टिमेटम दिला असला तरी उपोषणकर्त्याचा विश्वास बसलेला नाही. नाविलाजास्तव उपोषण मागे घेतले असल्याचे बोलले जात होते.उपोषण स्थळी गटविकास अधिकारी व त्यांचे कर्मचारी दाखल झाले असता त्या ठिकाणी उपस्थित असलेले पत्रकार बांधव चित्रीकरण करत असताना गट विकास अधिकारी व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी चित्रीकरण करण्यास नकार दिला. तसेच पत्रकार बांधवांनी विचारलेला प्रश्न चे उत्तर देण्यास गट विकास अधिकारी यांनी टाळाटाळ केली व उपोषण स्थळावरून काढता पाय घेत निघून गेल्या आहेत. 

उपोषणकर्त्यांनी त्यांच्या व्यथा गटविकास अधिकारी यांच्यासमोर मांडण्यास सुरुवात केली असता ग्रामसेवकांची गटविकास अधिकारी यांच्या समोरच दादागिरी काय कारवाई करायची ते करा असे उपोषणकर्त्यांना बेजबाबदारपणे ग्रामसेवकांने वक्तव्य करून एक प्रकारे त्यांना अपमानीतच केले आहे परंतु यावर गटविकास अधिकारी श्रीमती समृद्धी मोसमी लालाजी दिवाने - काळे यांनी ब्र शब्द देखील काढला नाही उलट उपोषणकर्त्यांनाच तुम्ही शांत रहा म्हणून सांगत होत्या.केज तालुक्यातील धनेगाव येथील रंजीत महादेव सोनवणे,संजय दत्तू सोनवणे,छत्रगुण पांडुरंग सोनवणे,खंडू शेषराव सोनवणे हे रमाई आवास योजने अंतर्गत मिळालेल्या घरकुल मंजुरी मस्टरचे पैसे तात्काळ देण्यात यावेत,दिनांक २६ जानेवारी २०२४ रोजी ग्रामपंचायत रोजगार सेवकास निलंबित करण्या साठी घेतलेला ग्रामसभेचा ठराव हा ग्रामसेवक यांनी पंचायत समिती कार्यालया स दाखल का केला नाही? याची चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी,रोजगार सेवकाची चौकशी करून त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी दिनांक ३० ऑगस्ट २०२४ रोजी पंचायत समिती कार्यालया च्या प्रांगणामध्ये आमरण उपोषणास बसले होते.

तसेच ग्रामरोजगार सेवक बाबासाहेब अरुण शिंदे हा गावातील लाभधारकांना व उपोषणकर्त्यांना काम करून देण्यासाठी पंधरा ते वीस हजार रुपये मागत  व काही नागरिकांकडून सदर रोजगार सेवकांनी घरकुल व विहीर मंजूर करून देण्यासाठी पैसे घेतले आहेत असा आरोप आमच्या प्रतिनिधीशी बोलताना उपोषणकर्त्यांनी केला आहे.  ग्राम रोजगार सेवक बाबासाहेब शिंदे हा उपोषणकर्त्यांना म्हणत आहे की, तुम्ही उद्या उच्च न्यायालयात गेला तरी माझे काहीच होणार नाही त्याचे कारण असे आहे की, माझ्या पाठीमागे मोठ्या पुढार्‍यांचे व नेत्यांचे हात असल्यामुळे माझे काहीच होऊ शकत नाही मी केलेला भ्रष्टाचार कोणीच उघडकीस आणू शकत नाही व मला १५ वर्ष तरी कोणीच कामावरु काढू शकत नाही असे  उपोषणकर्त्यांनी  बोलताना सांगितले आहे. दरम्यान गट विकास अधिकारी यांच्या दादागीरीची चर्चा परिसरात मोठ्या चवीने केली जात होती.

Post a Comment

0 Comments