Type Here to Get Search Results !

केज पंचायत समितीचा अजब कारभार एकाच रस्त्यावर एमआरईजीएस व प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतून काम सुरू व पैसे पण उचलले.

 केज पंचायत समितीचा अजब कारभार एकाच रस्त्यावर एमआरईजीएस व प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतून काम सुरू व पैसे पण उचलले. 


           


केज/प्रतिनिधी


केज पंचायत समितीमध्ये सध्या प्रशासक असल्या मुळे अधिकारी वर्ग टक्के वारीच्या नादात काय करत आहे हे त्यांना पण कळेनासे झाले आहे. कोट्यवधी रुपयांची कामे पंचायत समिती अंतर्गत चालू आहेत.त्यामध्ये प्रत्येक हेड ला टक्केवारी ठरलेली आहे.त्या नादात अधिकारी व कर्मचारी यांना अस्तित्वातनसलेल्या रस्त्यांची सुद्धा पैसे उचलणे सुरू आहे.त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे बोरगाव येथील रस्त्याचे काम होय.बोरगाव ते दैठणा हा रस्ता प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतूनचालू आहे व त्याच रस्त्याचे मस्टरपण एमआरईजीएस मधून चालू आहेत.या विषयात श्री.विकास शिंदे यांनी मा.जिल्हाधिकारी यांना तक्रार दाखलकेलेली असताना सुद्धा सदरील रस्त्याचे मस्टर पेमेंट मजुरांच्या नावे काढण्याचे काम गटविकासअधिकारी यांनी केले आहे.तसेचकेज  तालुक्यातचालू असलेल्या ९०/१०,८५/१५,२५/१५ व एमआरईजीएस ची अनेक कामे निकृष्टदर्जाची झालेली असताना त्यांना देयके देण्यात आलेली आहेत.काही रस्त्यावर तर काम न करताच बिले उचलण्यात आलेले आहेत.तसेच एमआरई जीएस अंतर्गत चालू असलेल्या विहिरीचे पण बोगस बिले देण्यात आलेली आहेत.यासंदर्भात लवकरच प्रत्येक गाव निहाय कामांची मालिका माध्यमातून प्रसिद्ध करण्यात येईल.तसेच बोरगाव ते दैठणा हा रस्ता प्रधानमंत्री ग्राम सडक योजना एक बडाराजकीय नेता करत असून तोच रस्ता एमआरईजीएस मधून करणारा पण त्याच नेत्याचा बगलबच्चा आहे. त्यांची पण नावे लवकरच जाहीर केली जातील. त्यांच्या दबावाखालीसध्या पंचायत समितीचेकर्मचारी व गटविकास अधिकारी काम करत आहेत.याचा लवकरच पर्दाफाश केला जाईल.लवकरच केज पंचायत समितीच्या बोगस कामकाजाची मालिका पहाण्यास मिळणार आहे.

Post a Comment

0 Comments