Type Here to Get Search Results !

कौशल्य,रोजगारासाठी युवकांनी नोंदणी करावी. प्रभारी तहसीलदार सचीन देशपांडे यांचे आवाहन.

 कौशल्य,रोजगारासाठी युवकांनी नोंदणी करावी.

प्रभारी तहसीलदार सचीन देशपांडे यांचे आवाहन.




केज/प्रतिनिधी


तहसील कार्यालय केज येथे शुक्रवार रोजी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना बाबत कार्यक्रम घेऊन नोंदणी करण्याचे आवाहन प्रभारी तहसीलदार सचीन देशपांडे यांनी केले आहे.

नोंदणी करण्याची कार्य पद्धती खालील प्रमाणे  असल्याच्या सूचना त्यांनी  यावेळी दिल्या.

सुरुवातीला कोणत्याही ब्राऊजरचा वापर करुन गुगलमध्ये या विभागाचे https://rojgar mahaswayam.gov. in ओपन करावे,वेब पोर्टलवर एम्प्लायर (लिस्ट ए जॉब) हा ऑप्शन निवडावा.त्यानंतर एम्प्लायर (लिस्ट ए जॉब) हा ऑप्शन निवडल्यानंतर उजव्या बाजूला Employer Login चा बॉक्स दिसेल यामध्ये आपला युझर आयडी व पासवर्ड टाकून लॉगइन करावे.पूर्वीची नोंदणी नसल्यास आपण खाली असणाऱ्या नोंदणी या टॅब वर क्लिक करून नवीन नोंदणी करावी.लॉगइन केल्यानंतर आपणास डॅशबोर्ड (Dashboard) दिसेल.आपल्या प्रोफाइल मध्ये डाव्या बाजूला पोस्ट व्हेकन्सी (Post Vacancy)क्लिककरावे. पोस्ट व्हेकन्सी टॅबमधील पहिला पर्याय व्हॅकन्सी टाइप (VacancyType) दिसेल यामध्ये आपणांस General,Apprentice, CMYKPY Y Training इ. पर्याय दिसतील. CMYKPY Training या पर्यायावर क्लिककरुन त्याखाली जॉब टायटल/पदनाम,नोकरीचा प्रकार, रिक्त पदांची एकूण संख्या ( रिक्त पदाची संख्या ही CMYKPY Training योजनेच्या शासन नियमा प्रमाणे उदा.शासकीय आस्थापना ५%,खाजगी आस्थापना १०%,खाजगी आस्थापना सेवा क्षेत्र २०% दर्शवाव्यात) रिक्त पदाचे स्वरूप,पद श्रेणी इ. टॅबमध्ये माहिती भरावी. त्यानंतर खाली disclaimer दिसेल त्या सुचना काळजीपूर्वक वाचुन मगच टिक करावे, सर्व अनिवार्य फील्डभरून पुढील बटणावर क्लिक करावे,पुढे Vacancy हा टॕब असून यामध्ये आपणांस शैक्षणिकअर्हता व कौशल्य इत्यादीमाहिती भरावयाची आहे.प्रथम Highest Qualificationनिवडावे. त्यानंतर Add टॅबचर क्लिक करावे,आपणांस CMYKPY Training करिता ज्या शैक्षणिक पात्रतेचे उमेदवार हवेत तीच शैक्षणिक अर्हत्ता टाकून रोव्ह बटनावर क्लिक करावे,आवश्यक असल्यास कौशल्यामा टॅब भरावा.त्यानंतर Criteria मध्ये वर नमुद केलेले शिक्षण व कौशल्य दिसेल ते Select कराये व Add your Criteria for vacancy यावर करुन Next बटणावर क्लिक करावे.पुढेReservation हा टॕब असून त्यामध्ये आपल्या पोस्ट करिता सामाजिक प्रवर्गामध्ये सर्व साधारण select करावे तसेच या योजनेसाठी वयोमर्यादा १८ ते ३५ नमुद करावी.पुढील टॅब मध्ये जॉब लोकेशन असून आपल्याला प्रत्यक्ष प्रशिक्षणाचे ठिकाण निवडावे लागेल तसेच उमेदवार कोणत्या जिल्हयातील अपेक्षित आहेत हे देखील नमुद करावे,त्यानंतरVacancy Validity मध्ये आपण जाहिरात (Vacancy) किमान ५ दिवस उमेदवारांना दिसायी या प्रमाणे तारखा निश्वित कराव्यात व अंतिमदिनांक नमुद करून Save Vacancy करावी,अंतिम दिनांक टाकुन सर्व माहिती योग्य असल्याची खात्री करुन SavedVacancy publish करावी जेणे करुन पात्र उमेदवार अर्ज करु शकतील.अशी माहिती श्री.सचीनदेशपांडे यांनी दिली.कार्यक्रमास विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments