Type Here to Get Search Results !

जीवन शिक्षण शैक्षणिक संकुल केज येथे ७८ वा स्वातंत्र्य दिवस मोठ्या उत्साहात साजरा.

 जीवन शिक्षण शैक्षणिक संकुल केज येथे ७८ वा स्वातंत्र्य दिवस मोठ्या उत्साहात साजरा.



    

केज /प्रतिनिधी

जीवन शिक्षण शैक्षणिक संकुलामध्ये ७८ वा स्वातंत्र्य दिनानिमित्त   कार्यक्रमास उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे सचिव मा. हारूण भाई इनामदार साहेब  कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मा. डॉ.त्र्यंबकराव चाटे साहेब यांच्या  हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले त्याबरोबर आजच्या कार्यक्रमासाठी केज नगरीच्या नगराध्यक्षा सौ.सिताताई बनसोड मॅडम,मा.नबीभाई इनामदार साहेब, उद्योजक मा.बहाऊद्दीन इनामदार साहेब, केज नगरपंचायतचे नगरसेवक मा.राजूभाई इनामदार, नगरसेवक सुमित बप्पा शिंदे, नगरसेवक सुग्रीव भाऊ कराड, नगरसेविका श्रीमती पद्मिनीताई शिंदे इत्यादी उपस्थित होते तसेच बन्सल क्लासेसचे संचालक यासिन इनामदार साहेब, प्राचार्य हांडीबाग सर,गोविंद ठोंबरे सर अस्थिव्यंग विद्यालयाचे मुख्याध्यापक विनायक ठोंबरे सर यांची उपस्थिती लाभली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक  आदरणीय साहेब यांनी विविध शैक्षणिक विषयांवर सखोल मार्गदर्शन केले.शाळेने कशा प्रकारे प्रगती केली याचा लेखा जोखा मांडला व सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. प्रमुख अतिथी आदरणीय डॉ त्र्यंबकरावजी चाटे साहेब यांनी आपल्या मनोगतामध्ये शाळेच्या शिस्ती विषयी खूप कौतुक केले पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. केज शहराच्या नगराध्यक्षा श्रीमती सीताताई बनसोड यांनी आपल्या मनोतामध्ये  शाळेमध्ये होणाऱ्या विविध उपक्रमांचा उल्लेख केला. शाळेतील प्रत्येक उपक्रमामध्ये त्या सहभागी असतात.असे मत व्यक्त केले .

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशोक दुरगुडे सर यांनी केले व आभार प्रदर्शन शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय रमाकांत ढाकणे सर यांनी केले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक मा.ढाकणे सर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सहकार्य केले.

Post a Comment

0 Comments