Type Here to Get Search Results !

केज शहरासह तालुक्यात भारतीय स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा.

 केज शहरासह तालुक्यात   भारतीय स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा.




केज/प्रतिनिधी


केज शहरासह तालुक्यात  सर्वच कार्यालये,शाळा, महाविद्यालयात भारतीय स्वातंत्र्यदिन विविध उपक्रम घेऊन मोठ्या उत्सवात साजरा करण्यात आला.केज नगरपंचायत कार्यालयाच्या प्रांगणामध्ये ध्वजारोहण नगराध्यक्षा सौ.सीताताई बनसोड यांच्या हस्ते संपन्न झाले. पंचायत समिती कार्यालया च्या प्रांगणात सहाय्यक गट विकास अधिकारी अभिमान राठोड यांच्या हस्ते तर गट साधन केंद्र  कार्यालयाचे ध्वजारोहण गटशिक्षणाधिकारी श्री. लक्ष्मण बेडसकर यांच्या हस्ते तसेच तहसील कार्यालयाचे ध्वजारोहण प्रभारी तहसीलदार सचिन देशपांडे यांच्या हस्ते करण्यात आले.उप विभागीय पोलिस अधिकारी कार्यालयाचे ध्वजारोहण सहाय्यक पोलीस अधीक्षक कमलेश मीना यांच्या हस्तेकरण्यात आले.केज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांच्या हस्ते तर तालुका कृषी कार्यालय,उपजिल्हा रुग्णालय,मृद व जल संधारण,सार्वजनिक बांधकाम उपविभाग कार्यालय,युसुफ वडगाव पोलीस ठाणे,ग्रामपंचायत कार्यालये यासह इतर कार्यालय व जिल्हापरिषद प्राथमिकशाळा,माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा व महाविद्यालयांमध्ये भारतीय स्वातंत्र्य दिन विविध उपक्रम घेऊन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे.

तहसील कार्यालयाच्या ध्वजारोहणास रामराव पाटील विद्यालय,सरस्वती कन्या शाळा,जीवनशिक्षण विद्यालय,स्वामीविवेकानंद विद्यालय,साने गुरुजी विद्यालय यासह अनेक शाळेने प्रभातफेरी केज  शहरातून काढून तहसील कार्यालयाच्या ध्वजारोहण समारंभात आपला सहभाग नोंदवला.

Post a Comment

0 Comments