Type Here to Get Search Results !

राष्ट्रीय ओबीसी महासंघा च्या बीड जिल्हाध्यक्षपदी संजय तोडकर यांचीनिवड

 राष्ट्रीय ओबीसी महासंघा च्या बीड जिल्हाध्यक्षपदी संजय तोडकर यांचीनिवड 



केज/प्रतिनिधी  


केज तालुक्यातील मांगवडगाव येथील सरपंच तथा युवा कार्यकर्ते संजय तोडकर यांची राष्ट्रीय ओबीसी महासंघा च्या बीड जिल्हाध्यक्षपदी संजय तोडकर यांचीनिवड करण्यात आली आहे. तोडकर यांनी आजपर्यंत केलेल्या कार्याची दखल घेऊन राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.बबनराव तायवाडे, राष्ट्रीय सचिव सचिन राजूरकर,व महाराष्ट्र राज्य अध्यक्ष श्री.प्रकाश भगिरथ व मराठवाडा अध्यक्ष पै.दिपक जाधव यांनी संजय तोडकर यांची बीड जिल्हाध्यक्ष म्हणून निवड केली आहे.याबाबत निवडीचे नियुक्ती पत्र संजय तोडकर यांना मुंबई येथे प्रदान करण्यात आले आहे.केज तालुक्यातील मांगवडगावं येथीलसरपंच संजय तोडकर हे गेल्या २० वर्षापासून सक्रिय राजकारणात सतत कार्यरत आहेत.राजकीय आणि सामाजिक कार्यात देखील सतत अग्रेसर असणारे व्यक्तिमत्व श्री. संजय गोपीनाथ तोडकर यांची राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या बीड जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.बीड जिल्ह्यातील केज-धारूर -अंबाजोगाई -परळी या चार तालुक्याचे कार्यक्षेत्र त्यांच्याकडे असणारआहे. राष्ट्रीय ओबीसीमहासंघाचे मराठवाडा अध्यक्ष पै.दिपक जाधव यांच्या हस्ते मुंबई येथे हे नियुक्ती पत्र देण्यात आले आहे. बीड जिल्ह्यातील ओबीसी समाजाच्या समस्याजाणून घेऊन त्या सोडविण्याचे कार्य करावे तसेच संघटना वाढीसाठी प्रयत्न करावेत असेही नियुक्ती पत्राद्वारे म्हटले आहे.यावेळी मराठवाडा अध्यक्ष पै.दिपक जाधव यांच्या हस्ते हे नियुक्तीपत्र देण्यात आले.यावेळी धाराशिवचे जिल्हाध्यक्ष जोतिराम कोरे,जिल्हा सरचिटणीस सतिष वैद्य व तालुकाध्यक्ष शंकर कराड आदीमान्यवर मंडळी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments