Type Here to Get Search Results !

विभागीय विज्ञान नाट्योत्सवासाठी साने गुरुजी निवासी विद्यालयाची निवड

 विभागीय विज्ञान नाट्योत्सवासाठी साने गुरुजी निवासी विद्यालयाची निवड 



केज/प्रतिनिधी


दिनांक २६ आॕगष्ट २०२४ रोजी राष्ट्रीय संग्रहालय परिषद भारत सरकार, नेहरू विज्ञान केंद्र वरळी, मुंबई आणि शालेयशिक्षण विभाग महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने बीड येथे आयोजित जिल्हास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात साने गुरुजी निवासी विद्यालयाने कु. साक्षी कराड लिखित व सौ.कविता गित्ते दिग्दर्शित आरोग्य व स्वच्छता या विषयावर आधारित "हागणदारी मुक्त गाव"या नाटकाने जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक मिळवून विभागीय स्पर्धेत आपले स्थान निश्चित केले आहे. या नाटकात कु.वृषाली चौरे,पुनम मैंद,हातागळे जान्हवी,फड निवृत्तीनाथ, तिडके ओमकार,कांबळे तेजस,चौरे अभिषेक, खोसे शिवराज या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट अभिनयाचे प्रदर्शन करत जिल्ह्यातील दहा संघातून प्रथम क्रमांक खेचून आणला आहे. या संघास कु.साक्षी कराड,दस्तुरेसर, श्रुती लहाने मॅडम, नागरगोजे मॅडम,काळे सर यांचे मार्गदर्शन लाभले आहे.तर प्रकाश योजना श्री.जाधवर सर यांची होती.सदर संघ विभागीय स्पर्धेत बीड जिल्ह्याचे नेतृत्व करणार आहे.या संघास विभागीय स्पर्धे साठी संस्था अध्यक्ष विधीज्ञ श्री.उद्धवराव कराड,कापसे सर,प्रा. गित्ते मॅडम व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.

Post a Comment

0 Comments