Type Here to Get Search Results !

पञकार संवाद याञेच्या फलकाचे हारुणभाई ईनामदार व नगराध्यक्षा सिताताई बनसोड यांच्या हस्ते अनावरण.

 पञकार संवाद याञेच्या फलकाचे हारुणभाई ईनामदार व नगराध्यक्षा  सिताताई बनसोड यांच्या हस्ते अनावरण.



केज /प्रतिनिधी 


दीक्षाभुमी ते मंञालय पञकार संवाद याञेच्या फलकाचे अनावरण जन विकास परिवर्तन आघाडी प्रमुख हारुणभाई  ईनामदार व केज नगर पंचायतच्या नगराध्यक्षा सौ.सिताताई बनसोड यांच्या उपस्थीतीत त्यांच्या  शुभहस्ते अनावरण करण्यात आले.यावेळी पञकार बांधवाशी वार्तालाप करताना जन विकास परिवर्तन आघाडी चे प्रमुख हारुणभाई ईनामदार यांनी पञकार संवाद याञेला शुभेच्छा दिल्या असुन पञकार बांधवांच्या मागण्या योग्य व रास्त आहेत.या मागण्यांचा शासनाने आस्थेवाईकपणे विचार करावा अशी आपली ईच्छा आहे.तसेच बीड येथे पञकार संवाद याञा आल्यावर आपण व नगराध्यक्षा सौ.सिताताई बनसोड स्वागतासाठी येणार असल्याचे त्यांनी सांगितले.आणि पञकार संवाद याञेला शुभेच्छा दिल्या आहेत.यावेळी युवा नेते सुमितबप्पा शिंदे, पञकार तात्या गवळी, विवेक बनसोड,चंद्रकांत पाटील आदी उपस्थीत होते.

Post a Comment

0 Comments