Type Here to Get Search Results !

No title

 सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यावर होणार कारवाई- प्रशांत महाजन



केज/प्रतिनिधी


केज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सर्व सुजाण नागरिकांना केज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांनी जाहीर आवाहन केले आहे की, सोशल मीडिया द्वारे फेसबुक,इंस्टाग्राम, व्हाट्सअप ग्रुप सह इतर तत्सम  एप्लीकेशनच्या माध्यमातून कोणत्याही समाजाच्या जाती धर्माच्या भावना दुखावतील अशा स्वरूपाच्या पोस्ट कॉमेंट्स,स्टोरी, स्टेटस,डिजिटल बॅनर असे प्रकार करण्यात नयेत तसेच सदर प्रकारास ग्रुप ॲडमिन जबाबदार राहतील  त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा केज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांनी दिला आहे. 

तसेच ग्रुप ॲडमिने ग्रुपच्या सेटिंग मध्ये ओन्ली एडमिन करून बदल करून घेण्यात यावेत जेणेकरून ग्रुप मधील कोणताही सदस्य वादग्रस्त पोस्टर ग्रुप वर टाकणार नाहीत जर ऍडमिन यांनी सेटिंग मध्ये ओन्ली एडमिन असा बदल केला नाही व कोणी सदस्यांनी वादग्रस्त पोस्ट टाकल्याने काही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास पोस्ट करणाऱ्या सदस्यासह ग्रुप ॲडमिन ला जबाबदार धरून योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल. त्यामुळे  केज शहरासह तालुक्यातील सुजाण नागरिकांनी एखाद्या समाजाची बदनामी होणार नाही याची दक्षता घ्यावी असे आव्उहन पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांनी केले आहे. यापुढे  सदर प्रकरणी कोणीही दोषी आढळून आल्यास त्याची घाई केली जाणार नाही त्याच्यावर कोठारात कठोर कारवाई केली जाईल

Post a Comment

0 Comments