Type Here to Get Search Results !

जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा तरनळी शाळेत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी साजरी.

 जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा तरनळी शाळेत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी साजरी.     


                     


केज /प्रतिनिधी 


जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा तरनळी केंद्र लव्हुरी ता.केज या शाळेत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेस राजाभाऊ कदम  मुख्याध्यापक,बापुसाहेब गायकवाड यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.अण्णाभाऊ साठे यांचे मुळ नांवडॉ.तुकाराम भाऊराव साठे हे होते. त्यांचा जन्म दि.१ऑगस्ट १९२० रोजी सांगली जिल्ह्यातील वाटेगाव ता.वाळवा येथे झाला. आईचे नाव वालुबाई वडील भाऊराव होते.ते अशिक्षितहोते.ते मार्क्स वादी,आंबेडकर वादी होते.त्यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीत देखील महत्त्वाची भूमिका बजावली.तेलोकशाहीर, कथा,कादंबरीकार होते.ते अस्पृश्य समाजातीलहोते. त्यांनी बहुजनांना उपयुक्त असे जनजागृतीचे कार्य केले तसेच लोकमान्य टिळक यांचा मृत्यू दि.१ ऑगस्ट रोजी झाला.त्यांनी स्वातंत्र्य चळवळीत महत्वाचे कार्य केले. लोकमान्य टिळकांनी वर्तमान पत्र काढुन जन जागृतीकेली.असेआपल्या प्रास्ताविकात जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा तरनळी शाळेचे मुख्याध्यापक श्री. राजाभाऊ कदम यांनी सांगितले.या शाळेतील बापुसाहेब गायकवाड, श्री.भारत हांगे, बाळासाहेब राठोड, श्रीमती सोनाली भुमकर, श्रीमती गिताताई अंडील यांनी सखोल माहिती सांगितली.विद्यार्थी- विद्यार्थ्यीनी श्रध्दा सरवदे इ.७ वी,प्रणव कांबळे इ.७ वी व इ.६वी तील ज्योती खामकर,श्वेता सरवदे, गीता खामकर ई.४ थी, अशोक खामकर इ.3 री यांनी आपले मनोगतव्यक्त केले.यावेळी शाळेतीलसर्व शिक्षक,शापोआ कामगार गणेश माने,शिक्षणप्रेमी राधाआक्का खामकर व गावकरी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments