Type Here to Get Search Results !

बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजयजी मुंडे यांचा केज तालुक्यात झंझावात जिवाचीवाडी येथे स्व. गोपीनाथरावजी मुंडे यांच्या नामफलक कमानीचे उद्घाटन संपन्न.

 बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजयजी मुंडे यांचा केज तालुक्यात झंझावात

जिवाचीवाडी येथे स्व. गोपीनाथरावजी मुंडे यांच्या नामफलक कमानीचे उद्घाटन संपन्न.



केज/प्रतिनिधी


कृषिमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांचा केज तालुक्यात झंझावात दौरा जागोजागी मोठ्या उत्साहात स्वागतकरण्यात आले.परंतु सत्कारात पुष्पहार गुच्छ न घेता सर्वांच्या भेटी घेऊन जीवाचीवाडी,तूकूचीवाडी येथील जनतेशी संवाद साधताना धनंजय मुंडे यांनी शेतकऱ्यांसाठी खुशखबर दिली की, मागील विज बिल भरायचे नाही येथून पुढे द्यायचे नाही शेतकऱ्यांच्या खात्या वर लवकरच ५००० रुपये अनुदान जमा करणार असल्याचे धनंजय मुंडे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना आश्वासित केले व यापुढेही आम्ही बहिण भाऊ दोघेही आपल्या अडचणी सोडवण्यासाठी सदैव आपल्या सेवेत राहू आणि आपले असलेले ऋण आमच्या कातडीचे जोडे करून जरी तुम्हाला घातले तरी हे ऋण आम्ही फेडु शकत नाही असे यावेळी धनंजय मुंडे यांनी बोलताना स्पष्ट केले आहे. 

तसेच परळी येथे पाच दिवसाचे कृषी प्रदर्शन आयोजित केले आहे तरी आपण या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावे असे आवाहन सर्व शेतकरी बांधवांना करतो असे पालकमंत्री धनंजय मुंडे  यांनी बोलताना स्पष्ट केले. तसेच यावेळी तुकुचीवाडी येथील महीलांनी पालकमंत्री धनजंय मुंडे यांचे औक्षण करूनराख्या बांधल्या आहेत. यावेळी माजी आमदार केशवदादा आंधळे,माजी जिल्हा परिषद सदस्य रमाकांत बापू मुंडे,तसेच परिसरा तील आजी माजी सरपंच व परिसरातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments