Type Here to Get Search Results !

केज तालुक्यातील कापरेवाडी येथे भानामतीचा प्रकार, रस्त्यावर सुया टोचलेले लिंबू आणि काळ्या बाहुलीच्या पोटात पती-पत्नीचे फोटो टाकले !

 केज तालुक्यातील कापरेवाडी येथे भानामतीचा प्रकार,

रस्त्यावर सुया टोचलेले लिंबू आणि काळ्या बाहुलीच्या पोटात पती-पत्नीचे फोटो टाकले !



केज/प्रतिनिधी                 


केज तालुक्यातील कापरेवाडी येथे अज्ञात व्यक्तीने रस्त्यावर लिंबू, बाहुली आणि पूजेच्या साहित्या सोबतच एका स्त्री आणि पुरुषांचे फोटो टाकून भानामती वकाळ्या जादूचा प्रकार समोरआला आहे.या बाबतची माहिती अशी की,चिंचोली फाटा ते चौसाळा रोडवरअसलेल्या हनुमंत पिंपरी या गावा जवळ असलेल्या कापरेवाडी जवळ रोडवर कोणी तरी अज्ञात व्यक्तीने काळ्या कपड्यातील बाहुली आणि तिचे पोट फाडून त्यात एका स्त्री पुरुषांचे पासपोर्ट आकाराचे फोटो,सुया टोचलेले लिंबू,लवंगा, काळे राळे टाकून भानामती किंवा काळ्या जादूचा प्रकार केला आहे. त्यामुळे गावात आणि परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. या पूर्वीही याच परिसरात अमावस्या,पौर्णिमेला कोणीतरी अज्ञातांनी असा प्रकार केलेला आहे. दरम्यान घटनेची माहिती सोमनाथ कापरे यांनी अंधश्रद्धा निर्मूलन समिती च्या कार्यकर्त्यांना देताच प्रा.हनुमंत भोसले आणि पत्रकार गौतम बचुटे यांनी घटनास्थळी जात नागरिकांना धीर देत अशा प्रकारे जादूटोणा किंवा भानामती व काळी जादू असा काही प्रकार नसून हा अंधश्रध्देचा प्रकार असल्याचे सांगितले. त्यामुळे कोणी घाबरून जावू नये असे ग्रामस्थांना सांगितले आहे.

फोटोतीलट व्यक्तींशी कोणीतरी सबंधित असण्याचा संशय :- या परिसरात पूर्वीही असे प्रकार घडलेले आहेत परंतु आता जे फोटो या भानामतीच्या प्रकारात आढळले आहेत त्या स्त्री पुरुषांच्या विरोधात किंवा त्यांच्या पासून दुखावलेले किंवा दुरावलेले असण्याची शक्यता आहे.

जादूटोणा विरोधी कायद्या नुसार कारवाही व्हायला हवी :- हे असले प्रकार करून समाजात भीती निर्माण करण्याचा अंधश्रद्धेचा प्रकार असून असल्या प्रकाराला आळा घालण्यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन आणि जादूटोणा विरोधी कायद्या नुसार कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांतून होत आहे.

Post a Comment

0 Comments