Type Here to Get Search Results !

स्वामी विवेकानंद माध्यमिक विद्यामंदीर शाळेमध्ये शिक्षक पालक मेळावा संपन्न विद्यार्थ्यां मध्ये जिज्ञासा निर्माण करणे गरजेचे. - माजी शिक्षणाधिकारी श्रीकांत कुलकर्णी. खूप झाले शिकवणे,आता थोडे त्यांना शिकू द्या - प्राचार्य डाॕ.हनुमंत सौदागर.

 स्वामी विवेकानंद माध्यमिक विद्यामंदीर शाळेमध्ये शिक्षक पालक मेळावा संपन्न

विद्यार्थ्यां मध्ये जिज्ञासा निर्माण करणे गरजेचे. - माजी शिक्षणाधिकारी श्रीकांत कुलकर्णी.

खूप झाले शिकवणे,आता थोडे त्यांना शिकू द्या - प्राचार्य डाॕ.हनुमंत सौदागर.



केज/प्रतिनिधी  


सध्याच्या या स्पर्धेच्या युगामध्ये स्पर्धा इतरांशी न करता स्वतःशीच करावी लागणार आहे.त्यासाठी विद्यार्थ्यांनी बुद्धीचा आवाका वाढवला पाहिजे यासाठीअभ्यासाव्यतिरिक्त शरीर निकोप व सुदृढ राहण्यासाठी खेळ आणि व्यायाम देखील महत्त्वाचा आहे,पाल्यांना केवळ भौतिक सुविधा पुरविणे म्हणजे पालकांचे कर्तव्य संपले असे नव्हे,तर जीवनातील विविध आव्हानांना सामोरे जाण्याचा आत्मविश्वास देखील निर्माण करणे गरजेचे आहे.वाममार्गा पासून त्यांना परावृत करा तसेच मुलांना मोबाईलचा वापर मर्यादित व योग्य कारणासाठी करायला सांगा.पालकांच्या उपस्थितीतूनच शाळेच्या वैभवाची प्रचिती येते असे प्रतिपादन माजी शिक्षणाधिकारी श्रीकांत कुलकर्णी यांनी केले.

जीवन विकास शिक्षण मंडळ केज,संचलितस्वामी विवेकानंद विद्यामंदिर माध्यमिक या शाळेमध्ये दि.१० ऑगस्ट २०२४  शनिवार रोजी शिक्षक पालक मेळावा संपन्न झाला.याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून श्री.अंकुशरावजी इंगळे,अध्यक्ष,जीवन विकास शिक्षण मंडळ संस्थेचे अध्यक्ष तथा सभापती,कृषी उत्पन्न बाजार समिती केज तर प्रमुख वक्ते म्हणून श्री. श्रीकांत कुलकर्णी माजी शिक्षणाधिकारी,प्राथमिक  विभाग जिल्हापरिषद बीड हे उपस्थित होते.इतर उपस्थित मान्यवरांमध्ये संस्थेचे सचिव श्री. गिन्यानदेव गदळे,डॉ. पांडुरंगतांदळे,फजीलोद्दीन काजी,नारायण अण्णा अंधारे,प्राचार्य डाॕ.हनुमंत सौदागर,ज्येष्ठ पत्रकार मधुकर सिरसट,शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ.शैलाताई इंगळे,शाळेच्या मु.अ.सौ. शिवनंदा मुळे,स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूलचे प्राचार्य श्री.उपेंद्र कोकीळ, प्राचार्य शंकर भैरट आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभीस उपस्थित मान्यवरांचे स्वागत सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री.प्रबोधकांत समुद्रे व शाळेतील मुलींनी 'सुजनांचे स्वागत करू या चला आनंदे भरून गीत गाऊ चला' स्वागतगीताने केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय सौ.शैलाताई  इंगळे यांनी दिला याप्रसंगी त्या म्हणाल्या की, विद्यार्थ्यांच्या जडणघडणी मध्ये पालकांचेही योगदान अतिशय महत्त्वाचे असते. तेंव्हा सध्याचा काळ, विद्यार्थ्यांची मानसिकता, पालकांची जबाबदारी व यामध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळेची भूमिका कायआहे याविषयी सविस्तरपणे उपस्थित पालकांना सखोल असे मार्गदर्शन केले.याप्रसंगी त्यांनी शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मधील विविध स्पर्धेमध्ये यशस्वी विद्यार्थ्यांचा गुणात्मक व संख्यात्मक आलेख सादर केला.मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या एस एस सी बोर्ड परीक्षामध्ये शाळेचा १०० टक्के निकाल लागला असून कु.सई शितोळे या विद्यार्थिनीने १०० टक्के गुण संपादित केले.तर  विशेष प्राविण्यासह १९२, प्रथम श्रेणीत १३,द्वितीय श्रेणीत १ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.विविध स्पर्धा परीक्षेतील गुणवंतविद्यार्थी एन एम एम एस व सारथी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये एकूण २५ विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र झाले आर्या लटपटे हिचीनवोदय साठीनिवड,डॉ.होमीभाभा बाल वैज्ञानिक स्पर्धेमध्ये जोया फातेमा सय्यद हिची सेकंड लेव्हलसाठी निवड, इयत्ता ५ वी व ८ वी तील एकूण ५ विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक,महाराष्ट्र टॅलेंट सर्च परीक्षेमध्ये संस्कृती मोरे केंद्रातून सर्वद्वितीय,एमटीएस ओलंपियाड राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षेमध्ये जिल्हा स्तरीय गुणवत्ता यादीमध्ये एकूण ६ विद्यार्थी तर केंद्रा तून 22 विद्यार्थी पात्रठरले आहेत.विविध क्रीडा स्पर्धे तील यशवंत खेळाडू- जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेत एकूण १२०३ खेळाडूंचा सहभाग,जिल्हा स्तरीय व्हॉलीबॉल व क्रिकेट स्पर्धेत शाळेतील संघाचा अनुक्रमे १० वेळा ७ वेळा सहभाग,विभागीय मैदानी स्पर्धेत१६२खेळाडू सहभागी,विभागीय व्हॉलीबॉल स्पर्धेत १ वेळा सहभाग,राज्यस्तरीय, वैयक्तिक,मैदानी स्पर्धेत ७१ खेळाडूंचा सहभाग, राष्ट्रीय मैदानी वैयक्तिक स्पर्धेत ६ विद्यार्थी सहभागी तसेच शाळेची माजी विद्यार्थिनी सध्या गडचिरोली जिल्ह्यात धानोरा येथे पीएसआय म्हणून कार्यरत असणारी स्वरूपा नाईकवाडे हिने राष्ट्रीय स्पर्धेत गोळा फेक मध्ये सतत दोन वेळा ब्रांझ मेडल मिळवून देशपातळी वर तृतीय येण्याचाबहुमान मिळवला.वादविवाद व वक्तृत्व स्पर्धेमध्ये शाळे तील विद्यार्थ्यांना विविध ठिकाणच्या सहभागातून एकूण १५ पारितोषिके मिळाली.तसेच मराठवाडा पातळीवरील तुळजापूर येथील सामान्य ज्ञान स्पर्धे मध्ये २ विद्यार्थ्यांना पारितोषिके मिळाली. 

एलिमेंटरी व इंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेड परीक्षेमध्ये शाळेचा निकाल १०० टक्के लागला असून एलिमेंट्री व इंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेड परीक्षेमध्ये अनुक्रमे ८२ व २ विद्यार्थी चांगल्या ग्रेडने उत्तीर्ण झाले आहेत.या व्यतिरिक्त लेझीम व इतरहीस्पर्धेमध्ये आपल्या शाळेच्या संघाने अनेक पारितोषिके पटकावली आहेत. उपस्थित पालकांच्या वतीने प्राचार्य डाॕ.हनुमंत सौदागर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.या प्रसंगी ते म्हणाले की, विद्यार्थी,शिक्षक,पालक ही त्रिसूत्री शाळेच्याउज्वल यशासाठी फार महत्त्वाचे असते.सध्याचे शैक्षणिक धोरण बदलत आहे,तेंव्हा बदलत्या शैक्षणिक धोरणा तील आव्हानांही आपल्याला सामोरे जावे लागणार आहे.कारण सध्याचा काळ हा कृत्रिम बुद्धिमत्तेचा आहे.आज 'खूप झाले शिक्षण आता, थोडे त्यांना शिकू द्या' असे म्हणण्याची वेळ आलेली आहे.मुलांना आवड असणाऱ्या क्षेत्रांमध्ये थोडं रमू द्या,आपल्या अपेक्षांचे ओझं त्यांच्यावरती लादू नका.अध्यक्षीयसमारोपात अंकुशरावजी इंगळे म्हणाले की,ही संस्था खऱ्या अर्थाने पालकांच्या सहकार्यातून चालते. शाळेचे विविध उपक्रम तसेच पालक मेळावा या माध्यमातून आपल्याला विद्यार्थ्यांच्या विविध समस्या जाणून घेतायेतात व त्यावरील उपाय देखील करता येतो.शेवटी ते म्हणाले की,केवळ पाल्याचा प्रवेश घेतल्याने पालकांची जबाबदारी पूर्ण होत नाही तर पालकांनीही आपल्या पाल्याची जबाबदारी तेवढीच काळजीने घेणे आवश्यक आहे.कार्यक्रमाच्या शेवटी शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मधील बेस्ट क्लास टीचर हा सन्मान सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री. प्रबोधकांत समुद्रे यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते देण्यात आला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री.प्रबोधकांत समुद्रे यांनी केले.तर आभार शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. शिवनंदा मुळे यांनी मानले.

Post a Comment

0 Comments