Type Here to Get Search Results !

चिंचोलीमाळी येथेश्रीकृष्ण जन्माष्टमी सोहळा व दहीहंडी उत्साहात साजरी

 चिंचोलीमाळी येथेश्रीकृष्ण जन्माष्टमी सोहळा व दहीहंडी उत्साहात साजरी


 


केज/प्रतिनिधी 


केज तालुक्यातील चिंचोलीमाळी येथे भाजपाचे जेष्ठ नेते सुनील आबा गलांडे पाटील यांनी उभारलेल्या श्रीकृष्ण मंदीरात सोमवारीश्रीकृष्ण जन्माष्टमी निमीत्त,गीता पठण,सांस्कृतिककार्यक्रमव हरिकीर्तनाचा कार्यक्रम तर मंगळवारी सकाळी पालखी मिरवणुक व त्यानंतर श्रीकृष्ण मंदीरा समोर दहीहंडीचाकार्यक्रम उत्साहात साजरा झाला.

श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त सोमवारी सकाळी ८ते१० दरम्यान श्रीकृष्ण मंदीरात विश्वांभर आप्पा शिरूरकर यांचे गीता पठण,रात्री ७ ते १० कर्मवीर विद्यालया तील विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम व रात्री ह.भ.प. प्रमोद महाराज पवार यांचे हरीकिर्तन व रात्री १२ वाजता श्रीकृष्ण जन्मा नंतर सर्व भाविकांना महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले.मंगळवारी सकाळी ११ वाजता श्रीकृष्ण मंदीरा पासुन श्रीकृष्ण नगर परीसरात पालखी मिरवणुक काढण्यात आली व दुपारी १२ वाजता श्रीकृष्ण मंदीरासमोर दहीहंडीचा कार्यक्रम झाला.वत्यानंतर भाविकांना महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले.

भाजपचे जेष्ठ नेते आणि श्रीकृष्ण मंदीराचे संस्थापक सुनील आबा गलांडे पाटील यांनी आयोजित केलेल्या या सोहळ्यास डोका येथील  सरपंच गोरख भांगे,केवड येथील चेअरमन गणेश सपाटे,चेअरमन अरुण काळे,चेअरमनबालाप्रसाद भुतडा व अन्य नेते मंडळी तसेच राम मेजर राऊत, मनोज गालफाडे,विठ्ठल झाडे,वसंत काळे शिक्षक पतसंस्थेचे सचिव संजय गलांडेसर,दगडु दळवे, दीलीप गायकवाड, नारायण महाराज भिसे, आश्रुबा वायबसे,ग्राम पंचायत सदस्य संजय महाराज नखाते,रविंद्र गलांडे,अजय काळे ग्रामपंचायत सदस्य सुरज गायकवाड,माणिक गालफाडे,आबा महाराज मेहरकर यांच्या सह पंच क्रोशीतील भावीक मोठ्या संख्येने हजर होते.

Post a Comment

0 Comments