Type Here to Get Search Results !

केज येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात कोरडेवाडी ग्रामस्थांनी केले रस्तारोको आंदोलन राजश्रीताई राठोड यांचे उपोषण सहा दिवसा पासुन चालू सहाव्या दिवशी औषध उपचार घेण्याचा राजश्रीताई यांचा नकार.

 केज येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात कोरडेवाडी ग्रामस्थांनी  केले रस्तारोको आंदोलन

राजश्रीताई राठोड यांचे उपोषण सहा दिवसा पासुन चालू  

सहाव्या दिवशी औषध उपचार घेण्याचा राजश्रीताई यांचा नकार.



केज / प्रतिनिधी 


केज तालुक्यातील 

कोरडेवाडी ग्रामस्थांनी साठवण तलावाचे काम मार्गी लागावे यासाठी केज येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातरस्तारोको आंदोलन करण्यात आले आहे.राजश्रीताई राठोड यांच्या उपोषणाला सहा दिवस पूर्ण झाले असून सहाव्या दिवशी औषध उपचार घेण्यास राजश्री ताईंनी नकार दिला आहे. 

दिनांक १४ ऑगस्ट रोजी केज तालुक्यातील कोरडेवाडी येथील  ग्रामस्थांनी आमच्या गाव च्या साठवण तलावाचे  काम मार्गी लावावे म्हणून गेल्या सहा दिवसापासून राजश्रीताई राठोड यांनी आमरण उपोषण चालू केले आहे.जोपर्यंत साठवण तलावाचा प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत उपोषण चालूच ठेवणार अशा भावना व्यक्त केल्या होत्या परंतु याची दखल सरकारमधील लोक प्रतिनिधी यांनी न घेतल्या मुळे  सरकारचे लक्षकेंद्रित करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज चौकात मोठ्या संख्येने एक तासा पेक्षा जास्त वेळ रस्ता रोको आंदोलन केले यावेळी गावातील नागरिकांनी आपल्या व्यथा प्रशासनामार्फत सरकारपर्यंत पोहोचवाव्यात अशी भावना व्यक्त केली तर काहीजणांनी सरकार निष्क्रिय आहे अशाभावना व्यक्त केल्या तर यापुढे आमचे साठवण तलावाचे काम मार्गी न लागल्यास आम्ही तीव्र आंदोलन छेडू असे धर्मवीर छत्रपती राजे शौर्य प्रतिष्ठानच्या वतीने इशारा देण्यात आलाआहे.

यावेळी तहसीलदारसचिन देशपांडे व जलसंधारण उपविभाग केज या कार्यालयाचे उप विभागीय जलसंधारण अधिकारी के.ए.ढाकणे यांनी वेग वेगळ्या कार्यालयाशी संपर्क साधून माहिती गोळा करून कोरडेवाडी साठवण तलावासाठी तीन चार दिवसात पाणी उपलब्धता प्रस्ताव तयार करून वरिष्ठ कार्यालयास मंजुरीसाठी पाठवला आहे असे आंदोलकांना सांगितलेआहे.तहसीलदार सचिन देशपांडे व जल संधारण अधिकारी ढाकणे यांनी उपस्थितनागरिकांना सांगितले की,आम्ही शासनाला योग्य असा प्रस्ताव पाठवला आहे व आम्हाला खात्री आहे की, आपले काम लवकरच मार्गी लागेल यामुळे आपण हे आंदोलन मागे घ्यावे असे जमलेल्या ग्रामस्थांना आवाहन केले व आलेल्या सर्व गावकऱ्यांनी हे आंदोलन मागे घेऊन प्रशासनाला सहकार्य करावे असे तहसीलदार सचिन देशपांडे यांनीगावकऱ्यांना विनंती केली व या विनंती वरून या आंदोलन मागे घेण्यात आले.सदर रस्ता रोको आंदोलन हे शांततेत पार पडले यावेळी केज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आला होता.या आंदोलना मध्ये महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात दिसून आली व कोरडेवाडी सह परिसरातील व केज  तालुक्यातील युवक, नागरिकांनी सहभाग मोठ्या प्रमाणात घेतला होता तसेच अनेक संघटनांनी या आंदोलनास पाठिंबा दर्शवून शासनाला विनंती करून सदर काम तात्काळ मंजूर करण्यात यावे अशीही विनंती करण्यात आली.

Post a Comment

0 Comments