Type Here to Get Search Results !

शासकीय विश्रामगृह केज येथे वंचित बहुजन आघाडीची आढावा बैठक संपन्न तालुकाध्यक्ष बाबासाहेब विठ्ठल मस्के यांच्या केज विधानसभेच्या उमेदवारीसाठी पक्षश्रेष्टीकडे मागणी करणार - शरद धीवार,अमोल हजारे

 शासकीय विश्रामगृह केज येथे वंचित बहुजन आघाडीची आढावा बैठक संपन्न


 तालुकाध्यक्ष बाबासाहेब विठ्ठल मस्के  यांच्या केज विधानसभेच्या उमेदवारीसाठी पक्षश्रेष्टीकडे मागणी करणार - शरद धीवार,अमोल हजारे




केज/प्रतिनिधी



शासकीय विश्रामगृह केज येथे वंचित बहुजन आघाडीची आढावा बैठक संपन्न झाली आहे. 

वंचित बहुजन आघाडीचे केज तालुकाध्यक्ष बाबासाहेब विठ्ठल मस्के  यांच्या केज विधानसभेच्या उमेदवारीसाठी पक्षश्रेष्टीकडे

 मागणी करणार आहेत असे आमच्या प्रतिनिधीशी बोलताना  शरद धीवार,अमोल हजारे यांनी सांगितले आहे. 

याबाबतची सविस्तर माहिती अशी की, केज मतदार संघ हा गेल्या अनेक वर्षापासून अनुसूचित जाती या प्रवर्गाला राखीव आहे परंतु या मतदारसंघांमध्ये अद्यापही कोणत्याही पक्षांनी बौद्ध समाजाला उमेदवारी देऊन निवडून आणले नाही. 

केज मतदार संघ हा नावापुरताच राखीव आहे याचा फायदा मात्र दुसरेच घेत आहेत त्यामुळे या मतदारसंघातील कार्यकर्ते व नागरिकांनी असे ठरवले आहे की, केज मतदार संघामध्ये केजचाच व बौद्ध समाजाचाच उमेदवार द्यायचा व तो उमेदवार निवडून आणायचा आहे त्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे पक्षप्रमुख ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांना भेटून उमेदवारीची मागणी करणार आहेत. 

गेल्या अनेक वर्षापासून केज तालुकाध्यक्ष  बाबासाहेब विठ्ठल म्हस्के हे ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या विचार तळागाळात पोचून आंबेडकर घराण्याशी एकनिष्ठ राहिले आहेत व ते पक्ष वाढीसाठी सतत काम करत आहेत. दिनांक १९ ऑगस्ट २०२४  रोजी शासकीय विश्रामगृह केज येथे आढावा बैठक घेण्यात आली व सदर बैठकीमध्ये सर्व कार्यकर्त्यांनी बाबासाहेब मस्के यांना केज विधानसभेची उमेदवारीची मागणी पक्षश्रेष्टीकडे करण्याचे ठरवले आहे. 

यावेळी केज तालुकाध्यक्ष बाबासाहेब विठ्ठल मस्के,जिल्हा उपाध्यक्ष धनराज सोनवणे, अमोल हजारे,शरद धीवार,प्रवीण मस्के, सचिन शिरसागर, उमेश कांबळे, धनंजय गव्हाणे, सागर धेंडे, अंकुश परीट, भैय्यासाहेब आरकडे, सचिन गायकवाड, प्रदीप गायकवाड, सुरज आरकडे, चंदबस वायकर, विशाल आरकडे, लखन आरकडे, बुधिराज आरकडे, राहुल धेंडे,  अनिल सरवदे,लखन मस्के,बबलू घाडगे यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते आणि ओबीसी समाजातील कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments