Type Here to Get Search Results !

मांगवडगाव येथील भारतरत्न राजीव गांधी माध्यमिक विद्यालयाची कु.थोरात सृष्टी विकास तालुकास्तरीय स्पर्धेत द्वितीय.

 मांगवडगाव येथील भारतरत्न राजीव गांधी माध्यमिक विद्यालयाची

कु.थोरात सृष्टी विकास

तालुकास्तरीय स्पर्धेत द्वितीय.


      


केज/प्रतिनिधी 


दिनांक १३ ऑगस्ट रोजी बालविवाह प्रतिबंधात्मक तालुकास्तरीय स्पर्धेचे गट साधन केंद्र केज येथे विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. त्यातील वक्तृत्व स्पर्धा या प्रकारात भारतरत्न राजीव गांधी माध्यमिक विद्यालय मांगवडगाव शाळेतील विद्यार्थीनीकु.सृष्टी विकास थोरात हिने मुलामुलींना शिक्षणाच्या समान संधी मिळाल्यातर या विषयावर आपले विचार व्यक्त केले. या स्पर्धेत कु.सृष्टी विकास थोरात हिचा द्वितीय क्रमांक आल्यानेगटसाधन केंद्र केजच्या वतीने यथोचित सत्कारकरण्यात आला.माऊली विद्यापीठा च्या संस्थापक अध्यक्षा खासदार सौ.रजनीताई पाटील,सचिव श्री.आदित्य दादा पाटील,प्रशासकीय अधिकारी श्री.प्रताप मोरे शाळेचे मुख्याध्यापक श्री. धनंजय खोसे यांनीही कु. सृष्टीचे अभिनंदन करुन पुढील जिल्हास्तरीय स्पर्धे साठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Post a Comment

0 Comments