Type Here to Get Search Results !

No title

 सैनीकहो तुमच्यासाठी कार्यक्रमाच्या निमीत्ताने तहसीलदार सचीन देशपांडे यांनी केला माजी सैनीकांचा सत्कार.



केज /प्रतिनिधी 


शनिवार दिनांक १० ऑगस्ट २०२४ रोजी  सकाळी दहा वाजता तहसील कार्यालयात सैनिक हो तुमच्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तहसीलदार सचीन देशपांडे यांनी या कार्यक्रमात संघर्ष माजी सैनीक संघटनेचे अध्यक्ष शेख अजिमोद्दीन मेजर व उपाध्यक्ष राम मेजर राऊत आणि संघटनेचे सर्व पदाधिकारी व सदस्य गण यांचा सत्कारकेला.यावेळी  माजी सैनीक उपस्थित होते.सर्व माजी सैनिकांना गुलाब पुष्प देऊन गौरविण्यात आले आणि माजी सैनीकांच्या समस्या जाणून घेण्याचा व त्यावर उपाय योजना करण्यात येतील असे आश्वासन दिले.संघटनेचे उपाध्यक्ष राम मेजर राऊत यांनी माजी सैनीकांच्या व्यक्तीगत काही समस्या त्यांच्यासमोर माडल्या त्या समस्येचे निराकरण तहसीलदार सचीन देशपांडे यांनी केले.राम राऊत मेजर यांनी सामुहिक अडचणी मांडताना सैनिकांना महाराष्ट्र शासनाच्या सवलतीमध्ये त्यांना त्यांचा लाभ द्यावा अशी मागणी केली उदा.विंधन विहिरी, घरकुल,रेशन मालाचा पुरवठा या सुविधा मध्ये माजी सैनिकांना देखील त्याचा लाभ द्यावा कारण देश सेवा करून वापस आल्यास प्रत्येकाला रोजगार उपलब्ध नाही त्यामुळे शेती व शेतीपूरक व्यवसाय करण्यासाठी या योजनाचा त्यांना फायदा होईल असे सांगितले. तसेच पुढे राम राऊत मेजर यांनी तहसीलदार  यांना विनंती केली की, तालुका पातळीवर असलेल्या सरकारी कार्यालयामध्ये माजी सैनीकास सन्मानपुर्वक वागणुक द्यावी व अशा आशयाचा फलक त्या कार्यालयासमोर लावावा अशी मागणी केली आहे. माजी सैनीकांच्या वतीने शेख अजिमोद्दीन ईनामदार मेजर यांनी आभार मानले.

Post a Comment

0 Comments