Type Here to Get Search Results !

परळीतला शेतकऱ्याचा कृषी महोत्सव नव्हता तर महाराष्ट्र सरकारचा सत्ता महोत्सव होता-भाई मोहन गुंड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या संदर्भात ब्र शब्द नाही !

 परळीतला शेतकऱ्याचा कृषी महोत्सव नव्हता तर महाराष्ट्र सरकारचा सत्ता महोत्सव होता-भाई मोहन गुंड 

जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या संदर्भात ब्र शब्द नाही !



केज/प्रतिनिधी


बीड जिल्ह्यामध्ये परळी तालुक्यात परवा दरवर्षी प्रमाणे याही वर्षी कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.बीड जिल्हा हा महाराष्ट्रमध्ये आत्महत्या करणारा जिल्हा म्हणून ओळख असणाऱ्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आधार देण्यासारखा ब्र शब्द मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री, पालकमंत्र्यांनी आत्महत्या बाबत काढला नाही.या कार्यक्रमात मात्र कृषी महोत्सवाचे प्रदर्शन कमी आणि राजकीय शक्ती प्रदर्शनास मोठ्या प्रमाणा वर केल्याचा आरोप शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई मोहन गुंड यांनी केला आहे.बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबताना दिसत नाहीत सुदैवाने बीड जिल्ह्यालापालकमंत्री पद मिळाले मात्र याकाळा मध्ये शेतकऱ्याच्या आत्महत्या थांबवण्यात यासाठी एक साधा प्रयत्न केल्याचा दिसत नाही. परळी मध्ये परवा कृषी मोहत्सवाच्या निमित्ताने मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री, पालकमंत्री,आणि इतर लोकप्रतिनिधींचे मोठमोठे होल्डिंग सजावट जवळपास एक होल्डिंगचा खर्च ३० ते ३५ हजाराचा खर्च असून या कृषी महोत्सवावर लाखो रुपयांची उधळपट्टी कशासाठी ?आज जिल्ह्या तील पिक विमा मिळत नाही.बॅंका कर्जासाठी दारात उभ्या करत नाहीत अनेक फळबागाच्या अनुदानाचे विषय आहेत. मागील अतिवृष्टीचे अनुदान अनेकांना मिळाले नाही.मागील वर्षाच्या पिक विम्याची बोळवन २५ टक्के केली.उर्वरित ७५ टक्के आज ही विमा मिळाला नाही.हे सगळे प्रश्न शेतकऱ्यांशी भेडसावत असताना हा कृषी महोत्सवाच्या माध्यमातून लाखो रुपयांची उधळपट्टी करून काय साध्य होईल ? या कृषी महोत्सावर झालेल्या एक एक रुपया खर्चाचा जवाब या कृषी विभागाला आम्ही विचारणार आहोत. येवढा अवाढव्य कार्यक्रमा साठी व्यर्थ खर्च करणे म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळल्या सारखे आहे.असा आरोप शेकापचे राज्य चिटणीस मंडळ सदस्य भाई मोहन गुंड यांनी प्रसिद्धी पत्रकात केला आहे.

Post a Comment

0 Comments