Type Here to Get Search Results !

राजीव गांधी भारतीय माहिती तंत्रज्ञान युगाचे जनक होत - वसुदेव बप्पा गायकवाड.

 राजीव गांधी भारतीय माहिती तंत्रज्ञान युगाचे जनक होत - वसुदेव बप्पा गायकवाड.



केज/ प्रतिनिधी


स्वानंद सार्वजनिक वाचनालय,आनंदगाव  ता.केज.जि.बीड  येथे दिनांक २० आॕगष्ट २०२४ रोजी स्व.भुतपूर्व पंतप्रधान राजीव गांधी जयंती व्याख्यान कार्यक्रम घेवून साजरी करण्यात आली.सर्वप्रथम राजीव गांधी यांच्या प्रतिमेचे पुजन पुष्पहार अर्पण करून करण्यात आले.

यावेळी जेष्ठ विचारवंत व जेष्ठ समाजसेवक वसुदेव बप्पा गायकवाड यांचे सुश्राव्य व्याख्यान संपन्न झाले.राजीव गांधी भारतीय माहिती तंत्रज्ञान युगाचे जनक होत असे प्रतिपादन वसुदेव बप्पा गायकवाड यांनी केले.

अध्यक्षस्थानी माजी सरपंच रामराजेगायकवाड हे होते प्रमुख पाहुणे म्हणून ह.भ.प.नारायण भाऊ गायकवाड,अरुण गायकवाड,पांडूरंग गायकवाड,रावसाहेब जाधव यांची विशेष उपस्थिती होती.उपस्थित मान्यवरांनीही आपले मनोगत व्यक्त केले.

अध्यक्षीय समारोप रामराजे गायकवाड यांनी केला.कार्यक्रमाचे प्रास्तापिक,सुत्रसंचलन, आभार प्रदर्शन गंथालयाचे आनंद भैय्या गायकवाड यांनी केले.

Post a Comment

0 Comments