Type Here to Get Search Results !

कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालय वाशी येथेगुंतवणूकदार जागरूकता कार्यक्रम संपन्न.

 कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालय वाशी येथेगुंतवणूकदार जागरूकता कार्यक्रम संपन्न.



वाशी/प्रतिनिधी 


भारतीय प्रतिभूती व विनिमय बोर्ड (सेबी) व नॅशनल स्टॉक एक्सचेंज (एन एस इ)कडून कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालय वाशी येथे महाविद्यालयीन विद्यार्थ्यां साठी एक दिवसीय

गुंतवणूकदार जागरूकता कार्यक्रम घेण्यात आला.

अलीकडे तरुण वर्गांमध्ये आर्थिक साक्षरता व आर्थिक नियोजनाचा अभाव दिसुन येतो. तरुणांचा कलदिवसेंदिवस चैनी वस्तू,मौजमजा,बर्थडे पार्टी अशा गोष्टींकडे होत चालला आहे तसेच फसवणूक करणाऱ्या योजना ज्यामध्ये कमी वेळेत अधिक परतावा देण्याचे अमिष दाखवून विद्यार्थ्यांची फसवणूक करतात यामुळे भविष्यात येणाऱ्या शैक्षणिक तसेच आर्थिक अडचणींनात्यांना सामोरे जावे लागते म्हणून विद्यार्थी दशेमध्ये योग्य ती आर्थिक नियोजन त्यांनी केले तर भविष्यातील येणाऱ्या आर्थिक संकटांना ते निश्चितपणे टाळू शकतात व आर्थिक दृष्ट्या ते श्रीमंत आणि समृद्ध नागरिक बनू शकतात यासाठीच सेबी तसेच नॅशनल स्टॉक एक्सचेंज एन एस इ चे सेक्युरिटीज मार्केट ट्रेनर श्री.गणेश चौधरी यांची यांनी विद्यार्थ्यांना आर्थिक नियोजनाचे मार्गदर्शन केले.या कार्यक्रमात त्यांनी विद्यार्थ्यांना बचत व गुंतवणूक याचे महत्त्व व फरक समजावूनसांगितला आर्थिक नियोजनाचे सात टप्पे समजावून सांगितले तसेच कॅपिटल मार्केट काय असते ? म्युच्युअल फंड व त्याचे वेगवेगळे फायदे,एक्सचेंज ट्रेडेड फंड ईटीएफ,गोल्ड बॉण्ड इत्यादी बाबत सखोल असे मार्गदर्शन केले या कार्यक्रमास मोठ्यासंख्येने महाविद्यालयीन विद्यार्थी उपस्थित होते विद्यार्थ्यांना सेबीची वेबसाईट व सेबीच्या सारथी ॲपचे महत्व सांगून विद्यार्थ्यांना खबरदारीच्या सूचना दिल्या हा कार्यक्रमयशस्वी रित्या पार पाडण्यासाठी प्राचार्य डॉक्टर अरुण गंभीरे सर,एचओडी डॉ. देवकते बालाजी,डॉ. जामगे संतोष,डॉ.जगताप चेतना,डॉ.करडे आनंद, प्राध्यापक आहेर पांडुरंग व इतर प्राध्यापकांनी प्रयत्न केले शेवटी आभार प्रदर्शन प्राध्यापक डॉ. देवकते बालाजी यांनी मानले.

Post a Comment

0 Comments