Type Here to Get Search Results !

स्वामी विवेकानंद विद्यामंदिर ( मा. वि. ) शाळेचे मुख्याध्यापक बाळासाहेब पांडुरंग तिडके यांचा सेवापूर्ती निमित्त गौरव सोहळा संपन्न

 स्वामी विवेकानंद विद्यामंदिर ( मा. वि. ) शाळेचे मुख्याध्यापक बाळासाहेब पांडुरंग तिडके यांचा सेवापूर्ती निमित्त गौरव सोहळा संपन्न




केज/प्रतिनिधी


जीवन विकास शिक्षण मंडळ, केज संचलित स्वामी विवेकानंद विद्यामंदिर माध्यमिक विभाग या शाळेमध्ये दि. ३१ जुलै  २०२४ रोजी शाळेचे मुख्याध्यापक श्री. बाळासाहेब पांडुरंग तिडके यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा संपन्न झाला. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून जीवन विकास शिक्षण मंडळ केज या संस्थेचे अध्यक्ष  तथा कृषी उत्पन्न बाजार समिती केजचे सभापती श्री. अंकुशरावजी इंगळे तसेच प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे सचिव श्री. गिन्यानदेव गदळे हे उपस्थित होते. इतर उपस्थित मान्यवरांमध्ये संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. पांडुरंग तांदळे, नारायण अण्णा अंधारे, शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ. शैलाताई इंगळे, सेवानिवृत्त मु.अ. बी. व्ही. गोपाळघरे, हनुमंत घाडगे, मा. वि. चे मु.अ. सौ. शिवनंदा मुळे, प्रा. वि. चे मु.अ. वसंत शितोळे, स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूलचे प्राचार्य उपेंद्र कोकीळ, स्व. प्रमोद महाजन महाविद्यालयाचे प्राचार्य शंकर भैरट, डॉ. प्रा. विजय ठोंबरे, प्रवीण देशपांडे आदी उपस्थित होते.


कार्यक्रमाच्या प्रारंभीस उपस्थित मान्यवरांचे स्वागत सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री. प्रबोधकांत समुद्रे व शाळेतील इयत्ता सहावीतील विद्यार्थिनी यांनी मराठमोळी रीत आमुची या स्वागतगीताने  केले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक श्री. हनुमंत घाडगे यांनी केले. याप्रसंगी ते म्हणाले, अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये या संस्थेची पायाभरणी झाली, या संस्थेच्या यशाचं खरं कारण म्हणजे शिस्त होय. पुढे ते म्हणाले तिडके सर हे बहुआयामी व्यक्तिमत्व आहे त्यांनी जीवनामध्ये शिस्तीला खूप महत्त्व दिले. शाळेच्या वतीने श्री. दत्ता सत्वधर यांनी आपले मनोगत व्यक्त केले ते म्हणाले, तिडके सर हे आदर्श पालक आहेत, वक्तशीरपणा, संतुलित आहार, निर्वेसनी व्यक्तिमत्व, थोडक्यात ते ऊर्जा देणारे व्यक्तिमत्व आहे तसेच त्यांची दोन्हीही मुले शैक्षणिक क्षेत्रात यशस्वी झालेली आहेत. याप्रसंगी त्यांनी आपल्या कवितेतून सरांच्या व्यक्तिमत्त्वांचे वर्णन केले. याप्रसंगी त्यांचे वर्गमित्र डॉ. प्रा. विजय ठोंबरे म्हणाले, कोणत्याही परिस्थितीवर ते हार मानत नाहीत उद्भवलेल्या परिस्थितीवर ते संयमाने व आत्मविश्वासाने सामोरे जात असत. 


कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते संस्थेचे सचिव श्री. गिन्यानदेव गदळे म्हणाले, प्रत्येक व्यक्तीला आपल्या कार्यक्षेत्रातून भूमिका बदलावी लागते. तेव्हा या संस्थेतील प्रत्येक शिक्षक पैशासाठी नव्हे तर समाधानासाठी काम करतो आहे. याप्रसंगी त्यांनी संस्थेच्या पायाभरणीपासूनच्या काही आठवणींना उजाळा दिला. 


याप्रसंगी सेवापुर्ती निमित्त  बोलताना श्री. बाळासाहेब तिडके म्हणाले, ही संस्था संघर्षातून पुढे आलेली आहे, शिक्षकांच्या सदैव पाठीशी असते, याच शाळेमध्ये रविवारी देखील विद्यार्थ्यांच्या तासिका होतात तसेच विद्यार्थ्यांकडूनही आम्हा शिक्षकांना ऊर्जा मिळत असते. पुढे ते म्हणाले, मी माझ्या कारकिर्दीमध्ये जे विद्यार्थ्यांना आवश्यक आहे तेच करत राहिलो. अध्यक्षीय समारोपात श्री. अंकुशरावजी इंगळे म्हणाले, प्रत्येक व्यक्तीने आपल्या जीवनामध्ये योग्य कार्य करावे म्हणजे त्याला त्याचे फलितही योग्य मिळते. त्याचप्रमाणे तिडके सरांनीही या संस्थेमध्ये प्रामाणिकपणे कार्य केले तेव्हा इतरांनीही त्यांचा आदर्श घेतला पाहिजे. 


कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री. प्रबोधकांत समुद्रे यांनी केले तर आभार शाळेच्या मु.अ. सौ. शिवनंदा मुळे यांनी मानले.

Post a Comment

0 Comments