Type Here to Get Search Results !

केज तालुक्यातील कोरडेवाडी येथील साठवण तलावास मंजुरी मिळावी म्हणून राजश्रीताई राठोड यांचे आमरण उपोषण तीन दिवसापासून आमरण उपोषण चालू मात्र लोक प्रतिनिधी व प्रशासनाने फिरवली पाठ राजश्रीताईं च्या उपोषणाला ग्रामस्थां चा भरभरून प्रतिसाद, नागरीकांच्या अश्रुचा बांध फुटला.

 केज तालुक्यातील कोरडेवाडी येथील साठवण तलावास मंजुरी मिळावी म्हणून राजश्रीताई राठोड यांचे आमरण उपोषण 


 तीन दिवसापासून आमरण उपोषण चालू मात्र लोक प्रतिनिधी व प्रशासनाने फिरवली पाठ


राजश्रीताईं च्या उपोषणाला ग्रामस्थां चा भरभरून प्रतिसाद, 

नागरीकांच्या अश्रुचा बांध फुटला.




केज/प्रतिनिधी 


केज तालुक्यातील कोरडे वाडी येथील साठवण तलावास मंजुरी मिळावी म्हणून धर्मवीर छत्रपती संभाजीराजेशौर्यप्रतिष्ठान,महाराष्ट्र राज्यच्या महिला प्रदेशाध्यक्षा राजश्रीताई राठोड या आमरण उपोषणास बसल्याआहेत.  तीनदिवसापासून आमरण उपोषण चालू मात्र लोक प्रतिनिधी व प्रशासनाने पाठ फिरविली असून राजश्रीताईंच्या उपोषणा ला ग्रामस्थांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे.या बाबतची सविस्तर माहिती अशी की,केज तालुक्या तील कोरडेवाडी येथे साठवण तलाव मंजूर करण्यात यावा या मागणी साठी ग्रामस्थ गेल्या ४० ते ५० वर्षापासून पाठपुरावा करत आहेत.परंतु या प्रकरणाकडे गांभीर्यपूर्वक लोकप्रतिनिधी व प्रशासन देखील पाहत नाही व सदर प्रकरणाची अद्यापही कसल्याच प्रकारची दखल घेतलेली नाही.२०२४ च्या लोकसभा निवडणुकीवर कोरडेवाडी येथील ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार टाकला होता. परंतु अद्यापही लोक प्रतिनिधी यांनी या महत्त्वाच्या प्रश्नाकडे पाहिले नाही व ग्रामस्थांशी भेटून चर्चा देखील केली नाही असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.राजश्रीताई राठोड या नांदेड जिल्ह्या तील माहूर तालुक्यातील रहिवाशी आहेत त्या धर्मवीर छत्रपती संभाजी राजे शौर्य प्रतिष्ठानच्या महिला प्रदेशाध्यक्षाम्हणून काम करत आहेत.केज तालुक्यामध्ये अनेक पक्षांचे मातब्बर लोक प्रतिनिधी तथा नेते आहेत परंतु कोरडेवाडी ग्रामस्थां च्या मदतीला अद्यापही कोणी धावून आले नाही अथवा शासन स्तरावर साठवन तलावाचा पाठ पुरावा करून त्यास मंजुरी मिळवली नाही परंतु दुसऱ्या जिल्ह्यातील एक कन्या येऊन ग्रामीण भागा तील नागरिकाच्या समस्यां वर उपोषणाच्या माध्यमा तून आवाज उठवत आहे व प्रशासनाला आणि लोकप्रतिनिधीला जागे करत असल्याचे यावरून दिसून येत आहे. कोरडेवाडी हे डोंगराळ भागातील एक ग्रामीण गाव असून या गावांमध्ये आजही पाण्याचा प्रश्न गंभीर आहे परंतु लोक प्रतिनिधी व प्रशासन या कडे लक्ष का देत नाहीत ? असा सवाल नागरिकांतून उपस्थित केला जात आहे. 

दिनांक ९ ऑगस्ट २०२४ रोजी पासून राजश्रीताई राठोड या कोरडेवाडी येथे आमरण उपोषणास बसल्या आहेत तरीत्यांच्या उपोषणाला अद्यापही लोक प्रतिनिधी व प्रशासनातील अधिकारी कर्मचारी यांनी भेट दिली नाही असा आरोप त्यांनी केला आहे.परंतु त्यांच्या या उपोषणाला ग्रामस्थांचा भरभरून प्रतिसाद मिळत असल्याचे पाहावयास मिळत आहे.आमच्या प्रतिनिधीशी बोलताना राजश्रीताई म्हणाल्या की, जोपर्यंत प्रशासन कोरडे वाडी येथील साठवण तलावाच्या मंजुरीचे पत्र देत नाहीत तोपर्यंत मी माझे आमरन उपोषण चालूच ठेवणार आहे.मी येथील गावकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. आमदार असो की, खासदार असो अथवा प्रशासनातील कोणीही अधिकारी असे कोणीही कसलेही पत्र घेऊन आले तरी मी माझ्या भूमीवर ठामच राहणार आहे.मी कसल्याही अमीषालाबळी पडणार नाही असे त्यांनी बोलताना स्पष्ट केले आहे. दरम्यान ग्रामस्थांनी प्रतिक्रिया देताना त्यांच्या अश्रुचा बांध फुटला आहे. ह.भ.प. महादेव महाराज चाकरवाडीकर, मा.आमदार पृथ्वीराज साठे व शेतकरी कामगार पक्षाचे भाई मोहन गुंड, सामाजिक कार्यकर्ते ॲड. निखिल बचुटे यांनी उपोषण स्थळी भेट देऊन आपला पाठिंबा दर्शविला आहे.

Post a Comment

0 Comments