Type Here to Get Search Results !

राष्ट्रमाता अहिल्याबाई होळकर एक उत्कृष्ट न्यायाचार्य -उपप्राचार्य श्रीमती स्नेहल पाठक

 राष्ट्रमाता अहिल्याबाई होळकर एक उत्कृष्ट न्यायाचार्य -उपप्राचार्य  श्रीमती स्नेहल पाठक   



केज/प्रतिनिधी


साने गुरुजी निवासी विद्यालयात राष्ट्रमाता अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिशताब्दी जन्मोत्सवानिमित्त संस्कार भारती देवगिरीप्रांत यांच्या विविधकार्यक्रमआयोजित कार्यक्रमा निमित्त व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.यात सिद्धेश्वर महाविद्यालय माजलगावच्या उपप्राचार्य श्रीमती स्नेहल पाठक यांनी पुण्यश्लोक राष्ट्रमाता अहिल्याबाईंच्या जीवना वर प्रकाश टाकत त्यांचे राजकीय नेतृत्व त्यांचा समाजाप्रती सेवाभाव त्यांचे धार्मिक कार्य,एक उत्कृष्ट न्यायदाता या कार्यांवर प्रकाश टाकत अगदी सोप्या व ओघवत्या भाषेत विद्यार्थ्यांना जणू काही अहिल्याबाईंचा जीवनपटच आपल्या व्याख्यानातून उलगडून सांगितला.यावेळी अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष एड.उद्धवराव कराड हे उपस्थित होते. या व्याख्यानास प्राध्यापक कविता गित्ते,कांदे मॅडम, वडमारे मॅडम,मोती सर व इयत्ता आठवी ते बारावीचे सर्व विद्यार्थी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्र संचालन काळे सर यांनी केले तर आभार श्री. तरकसे सर यांनी मांडले.

Post a Comment

0 Comments