Type Here to Get Search Results !

केज तालुक्यात शेतात काम करीत असलेल्या महिलेचा विनयभंग दीड महिन्या पासून करीत होता महिलेचा पाठलाग : पीडितेला गावातून हाकलून दिल्याची दिली होती धमकी

 केज तालुक्यात शेतात काम करीत असलेल्या महिलेचा विनयभंग 


दीड महिन्या पासून करीत होता महिलेचा पाठलाग : पीडितेला गावातून हाकलून दिल्याची दिली होती धमकी




केज /प्रतिनिधी


शेतात सोयाबीनच्या पिकातील तण काढीत असलेल्या अनुसूचित जातीच्या विवाहित महिलेचा गावातील एका नराधमाने विनयभंग केल्याची घटना घडली आहे.


या बाबतची माहिती अशी की, दिनांक १७ ऑगस्ट२०२४ रोजी केज तालुक्यातील एका गावात एक अनुसूचित जातीची महिला व तिची भावजयी या दोघी सोयाबीनच्या पिकातील तण काढीत होत्या. त्यावेळी दुपारी २:१५ वा. आनंद सुधाकर कातमांडे हा शेतात तिच्या पाठी मागून जाऊन तिच्याशी झोंबाझोंबी केली व तिच्याशी ओढाओढी करून तिला खाली पडले आणि विनयभंग केला. तसेच ती त्याला आवडते असे सांगून तिच्याकडे शरीरसुखाची मागणी केली. त्या महिलेने आरडाओरड केल्या नंतर तिची भावजई आली. पीडित महिलेची त्याच्या पासून सुटका करीत असताना आनंद कातमांडे याने तिला शिवीगाळ करून चापटाने मारहाण केली आणि खोटा गुन्हा दाखल करून जिवे मारण्याची धमकी दिली. 

या प्रकारामुळे पीडित महिला घाबरून गेली होती तसेच तिचे पती व वडील घरी नव्हते. दि. १९ ऑगस्ट रोजी पीडित महिलेच्या तक्रारी वरून आनंद कातमांडे यांच्या विरुद्ध केज पोलिसात गु. र. नं. ४५९/२०२४ भा. न्या. सं. ७४, ७५, ७६, ७८, ७९, ११५(२), ३५२, ३५१(२), ३५१(३) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

या प्रकरणी पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक आनंद शिंदे हे तपास करीत आहेत.

महिला अनुसूचित जाती पैकी असताना गुन्हेगाराला ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल नाही ? 

पीडित महिला ही अनुसूचित जातीतील असताना आणि गुन्हेगार हा तिला ओळखत असताना सुद्धा त्याच्या विरुद्ध अनुसूचित जाती व जमाती अन्याय अत्याचार प्रतिबंधक कायदा १९८९ नुसार कारवाही केली गेली नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

दीड महिन्यापासून नराधम करीत होता पीडितेच्या पाठलाग ! 

सुधाकर कातमांडे हा मागील एक ते दिड महीण्या पासुन ती विवाहित रस्त्याने ये-जा करताना आणि शेताकडे जाताना तिच्या मागे-पुढे चालुन पाठलाग करून हातवारे व इशारे करुन जवळीक साधण्याचा प्रयत्न करीत होता. परंतु पिडितेने त्याला वांरवार विरोध केला असता जिवे मारण्याच्या व गावातून हाकलुन देण्याची धमकी देत होता. 

इज्जतीच्या भीतीने पिडीतेने  केली नाही :-

पीडितेच्या सासर व माहेर एकाच गावात असल्याने गावात व सर्वात इज्जत जाईल. म्हणून तिने याची वाच्यात केली नव्हती; परंतु त्याने नंतर तिला जास्त त्रास द्यायला सुरुवात केली. म्हणून तिने ही माहिती नवरा व वडिलांना दोघांना दिली. त्यांनी त्याला समज देखील दिली होती.

Post a Comment

0 Comments