Type Here to Get Search Results !

केज तालुक्यातील सारणी (आ.) येथील सरकारी गायरान जमीन दोन एकर बौद्ध विहारासाठी देण्यात यावी नागरिकांची मागणी अन्यथा तिव्र आंदोलन करण्याचा लेखी निवेदना द्वारे दिला इशारा

 केज तालुक्यातील सारणी (आ.) येथील सरकारी गायरान जमीन दोन एकर बौद्ध विहारासाठी देण्यात यावी नागरिकांची मागणी

अन्यथा तिव्र आंदोलन  करण्याचा लेखी निवेदना द्वारे दिला इशारा 



केज/प्रतिनिधी


केज तालुक्यातील सारणी (आ.)येथील सरकारी गायरान जमीनी पैकी दोन एकर जमीन बौद्ध विहारा साठी देण्यात यावी अशी  मागणी दलित समाज बांधवांनी लेखी निवेदना द्वारे तहसीलदार केज व  सारणी आ.ग्रामपंचायतचे सरपंच,ग्रामसेवक यांच्या कडे केली आहे जर सदर जागा लवकरात लवकर बौद्ध विहारासाठी नाही दिली तर तिव्र आंदोलन  करण्यात येईल असा इशारा प्रशासनास लेखी निवेदनाद्वारे दिला आहे. 

याबाबतची सविस्तर माहिती अशी की,केज तालुक्यातील सारणी (आ.)येथील सरकारी गायरान जमीन सर्वे नं. १मधील २ एकर जमिनी ही बौद्ध विहार बांधण्या साठी देण्यात यावी तसेच सारणी येथे बौद्ध समाज बांधवांची मोठी संख्या असून तेथे बौद्ध विहार बांधण्यासाठी दुसरी कुठलीही जागा उपलब्ध नाही.समाज हा मोठ्या प्रमाणात असून देखील समाजाचे व वैयक्तिक कार्यक्रम घेण्यासाठी बुद्ध विहार नसल्यामुळे दलित समाज बांधवांना कार्यक्रम घेता येत नाही व त्यांची दुर्दशा होत आहे.त्यामुळे गावाच्या पश्चिमेस असलेल्या सोनेजवळा रोडवरील उत्तरेकडील सरकारी गायरान जमीन पैकी दोन एकर जमीन ही बौद्ध विहार बांधण्यासाठी आवश्यक आहे.त्या ठिकाणी बौद्ध विहार झाले तर आमच्या गावाला शोभा येईल व आमचे धार्मिक व वैयक्तिक कार्याला हातभार लागेल तसेच आम्ही अनेक वेळा ग्रामपंचायत कार्यालयास अर्ज करून मागणी केली आहे परंतु सातत्याने दुर्लक्ष केले जात आहे त्यामुळे अद्यापहीआमच्या बौद्ध विहाराचा प्रश्न मार्गी लागला नाही.लवकरात लवकर बौद्ध विहारासाठी सदर जागा देण्यात यावी या मागणीचे निवेदन तहसीलदार केज वसारणी (आ.) ग्रामपंचायतचे सरपंच व ग्रामसेवक यांना  देण्यात आले आहे.जर सदर जागा बौद्ध विहारा साठी लवकरात लवकर देण्यात आली नाही तर तहसील कार्यालयाच्या समोर आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील देण्यात आला आहे.सदर लेखी निवेदनावर अजय बनसोडे,पवन खरात, बालासाहेब बनसोडे, प्रीतम खरात,प्रवीण बनसोडे यांच्यासह समाज बांधवांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Post a Comment

0 Comments