Type Here to Get Search Results !

जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा तरनळी शाळेत एस.एम.स्वामी नाथन यांची जयंती साजरी.

 जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा तरनळी शाळेत एस.एम.स्वामी नाथन यांची जयंती साजरी.                                   



केज /प्रतिनिधी 


जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा तरनळी या शाळेचे मुख्याध्यापक श्री राजाभाऊ कदम यांनी व सर्वशिक्षकांनी एस.एम. स्वामीनाथन या शास्त्रज्ञा च्या जयंतीनिमित्तपुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.एस.एम.स्वामीनाथन या शास्त्रज्ञाचा जन्म दि.७ ऑगस्ट १९२५ रोजीभारत देशातील तामिळनाडू राज्यातील तंजावूर येथे झाला.त्यांना १९९७ साली -पद्मश्री,१९७२ साली -पद्मभूषण,१९८९ साली -पद्मविभूषणाने सन्मानित केले होते.असे आपल्या प्रास्ताविकात श्री. राजाभाऊ कदम यांनी सांगितले.स्वामीनाथन यांनी कृषीक्षेत्रात जादा उत्पन्न देणाऱ्या गव्हाच्या, तांदळाच्या विविध प्रकारच्या अनेक जाती शोधून काढल्या.त्यामुळे जगभरात त्यांना सन्मान मिळाला.ते हरितक्रांतीचे जनक होते.ते आंतरराष्ट्रीय भात संशोधन संस्थेत महा संचालक होते.असे बापुसाहेब गायकवाड यांनी सांगितले.या शाळेतील सर्व शिक्षकांनी ही स्वामीनाथन या शास्त्रज्ञाबाबत आपले मनोगत व्यक्त केले.

Post a Comment

0 Comments