Type Here to Get Search Results !

कुळ हक्काने प्रतिबंधीत हक्काने प्राप्त झालेल्या जमीनीबाबत झालेल्या खरेदीविक्री हस्तांतरणा बाबत केज तहसीलदार यांना भुसुधार उप जिल्हाधिकारी यांचे फेर तपासणी करण्याचे आदेश.

 कुळ हक्काने प्रतिबंधीत हक्काने प्राप्त झालेल्या जमीनीबाबत झालेल्या खरेदीविक्री हस्तांतरणा बाबत केज तहसीलदार यांना भुसुधार उप जिल्हाधिकारी यांचे फेर तपासणी करण्याचे आदेश.



केज/प्रतिनिधी 


सन १९५५ ते १९६० दरम्यान हैद्राबाद इनाम निर्मुलन कायदा १९५४ चे पोट कलम ६(१) नुसार कुळ हक्काने प्रतिबंधीत हक्काने प्राप्त झालेल्या जमीनी बाबत झालेले खरेदी विक्री व हस्तांतरा बाबत केज तहसिलदार यांना भुसूधार उप जिल्हा अधिकारी बीड यांनी फेरतपास करण्याचे दिले आदेश दिले आहेत.या बाबत सविस्तर माहीती अशी की,मौजे सोनीजवळा ता.केज हद्यीतील जमीन सर्व्हे नंबर ६८ एकुण क्षेत्रफळ १३ हेक्टर ४८ आर वर असलेले पांडुरंग रामकिसन गवळी व ईतर २१ यांचा खरेदीखत व फेरफार आधारे घेण्यात आलेला फेरफार व अनाधीकृत ताबा काढुन तो अर्जदार अविनाश गोविंद बनसोडे रा.सारणी (आ) ता.केज ह.मु.कळंब रोड केज व इतर ७ यांना मिळण्याबाबत मा.श्री. शैलेश सुर्यवंशी उप जिल्हाधिकारी सामान्य, जिल्हाधिकारी बीड यांचे न्यायालयात संचिका क्रं. २०१८/भुसूधार/कुळ/कावी/१/१४/बनसोडे हे प्रकरण अविनाश व ईतर विरुध्द पांडुरंग व इतर हे प्रकरण दिनांक २५/०२/ २०२२ रोजी दाखल करण्यात आले व त्यामध्ये मे.न्यायालयाने दिनांक २७/०१/२०२४ रोजी दोन्ही बाजुचे म्हणणे व युक्तीवाद ऐकून घेऊन व कागदपत्राची पडताळणी करुन दिनांक ०५/०७/ २०२४ रोजी संरक्षीत कुळा संदर्भात योग्य तो आदेश पारीत होण्याबाबत व अर्जदाराचे हक्क १९५५ ते १९५९ वरील खासरा पत्रक व कुळाचा घोषवारा भाग १ मध्ये दिसुन आल्याने व ईतर कागदपत्र यांची पडताळणी करुन प्रस्तुत प्रकरण केज तहसिलदार यांनी संरक्षीत कुळ संदर्भात योग्य ते आदेश पारीत करण्याचे आदेश पारीत केलेला आहे. प्रस्तुत प्रकरणात अर्जदार अविनाश गोविंदराव बनसोडे(मो.नं८६०५०९६७९) सतिश गोविंदराव बनसोडे,शिवाजी संभाजी बनसोडे,अमृत नारायण बनसोडे,दिपक नारायण बनसोडे,लक्ष्मण बळीराम बनसोडे,मिलींद बळीराम बनसोडे सर्व रा.सारणी (आ) ता.केज यांच्यावतीने दाखल करण्यात आले. यांचे प्रकरण विधीज्ञ श्री. श्रीनिवास विलास कुलकर्णीमो.नं९७६७५३०५५० (पाटोदकर) वकील संघ अंबाजोगाई यांनी दाखल करुन या मध्ये सदरचा योग्य तो कायदेशिर युक्तीवाद केला व त्यांना विधीज्ञ सर्वश्री. सचिन कुलकर्णी,विशाल घोबाळे,संतोष देशपांडे, डि.जे.कदम यांनीसहकार्य केले.या निकाला बाबत संबंध बीड जिल्ह्यात चर्चा होत असुन न्यायालयाच्या योग्य निर्णयामुळे योग्य न्याय मिळाल्या बाबत चर्चा होत आहे.

Post a Comment

0 Comments