Type Here to Get Search Results !

केज तालुक्यात साथीच्या आजाराने नागरिक त्रस्त! राजेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णांची संख्या वाढली डॉक्टरांकडून रुग्णांवर वेळेत उपचार होत असल्याने नागरिकांमध्ये समाधान

 केज तालुक्यात साथीच्या आजाराने नागरिक त्रस्त!


राजेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णांची संख्या वाढली


डॉक्टरांकडून रुग्णांवर वेळेत उपचार होत असल्याने नागरिकांमध्ये समाधान



 केज/प्रतिनिधी 


सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने कधी पाऊस तर कधी ऊन तर कधी थंडी अशा बदलत्या हवामानामुळे केज तालुक्यातील नागरीकांना साथीच्या आजाराने हैराण केले आहे. तर राजेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली असून एरवीच्या बाह्य रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ झाली असल्याने या ठिकाणचे वैद्यकीय अधिकारी डॉ.अशोक मुंडे यांनी प्रा.आरोग्य केंद्रातील सर्व कर्मचाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या असुन सर्व कर्मचारी अहोरात्र रुग्णांची सेवा करत आहेत.

याबाबतची सविस्तर माहिती अशी की, सध्या सर्वत्र पावसाळ्याचे दिवस असल्याने केज तालुक्यात उन पावसाचा खेळ सुरु आहे. तालुक्यात म्हणावा तेवढा पाऊस पडत नसला तरी वातावरणात झालेल्या बदलामुळे व्हायरल इन्फेक्शन प्लस बॅक्टेरीया यापासून उद्भवणारे साथीचे आजार मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत. यामध्ये सर्दी, खोकला थंडी,ताप अशा आजाराने नागरिक हैराण झाले आहेत. त्यामुळे राजेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील  वैद्यकीय अधिकारी डॉ.अशोक मुंडे यांनी आरोग्य केंद्रातील आपल्या सर्व कर्मचाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या असुन आपली सर्व यंत्रणा कामाला लावली आहे.तसेच राजेगाव या प्राथमिक आरोग्य केंद्रात एरवी ६० ते ७० असणारी बाह्य रुग्णांची संख्या आता १५० च्या वर जावु लागली आहे. वैद्यकीय अधिकारी डॉ.अशोक मुंडे यांनी राजेगाव या प्रा.आ.केंद्रात मुबलक प्रमाणात औषध साठा उपलब्ध केला असुन रुग्णांनी न घाबरता या ठिकाणी उपचार घ्यावेत. असे आवाहन जनतेला केले आहे. या रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ.अशोक मुंडे , वैद्यकीय अधिकारी डॉ.विशाल ढेंगळे, औषध निर्माण अधिकारी डी.एम. मोराळे, प्रयोग शाळा वैज्ञानिक अधिकारी अमोल गालफाडे, आरोग्य सेविका श्रीमती. ढाकणे, श्रीमती. ससाने, श्रीमती.डिस्ले, श्रीमती.सपकाळ, आरोग्य सेवक जाधव जे.पी., रुग्णवाहिका चालक मोमीन शेख व गरकल यांचेसह राजेगाव प्रा.आ.केंद्रातील सर्व कर्मचारी अहोरात्र मेहणत घेवुन रुग्णांची सेवा करत आहेत.

Post a Comment

0 Comments