Type Here to Get Search Results !

येवता येथील तिघां जणां विरुद्ध ॲट्रॉसिटी ॲक्ट नुसार केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आठ वर्षाच्या बालकाचे झाडाला एक हात व पाय बांधून ठेवल्याची येवता येथील घटना

 येवता येथील तिघां जणां विरुद्ध ॲट्रॉसिटी ॲक्ट नुसार केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

आठ वर्षाच्या बालकाचे झाडाला एक हात व पाय बांधून ठेवल्याची येवता येथील घटना 



केज/प्रतिनिधी


येवता येथील तिघां जणां विरुद्ध ॲट्रॉसिटी ॲक्ट नुसार केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

करण्यात आला असून एका आठ वर्षाच्या बालकाचे झाडाला एक हात व एक पाय बांधून ठेवल्याची घटना येवता येथे घडली आहे.या बाबत ची सविस्तर माहिती अशी की, संतोष मधुकर गायकवाड वय ३४ वर्षे व्यवसाय मजुरी रा.येवता ता. केज जि.बीड येथील रहिवासी असून त्यांच्या कुटुंबामध्ये पत्नी सौ. संतोषी गायकवाड व त्यांना तीन मुले आहेत. बाळू गायकवाड आठ वर्षे,यश गायकवाड,उत्तम गायकवाड यांच्या सह  येवता येथे राहत आहेत मजुरी करून कुटुंबाची उपजीविका भागवत आहेत.दिनांक २९ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी ९-०० वाजण्याच्या सुमारास संतोषगायकवाड हे शेलगाव गांजी येथे तर त्यांची पत्नी शिंदी येथे कामासाठी गेले होते. त्यांचा मुलगा बाळू हा नेहमीप्रमाणे गावातील जिल्हा परिषद शाळेमध्ये गेला होता.संतोष गायकवाड हे दुपारी १-०० वाजण्याच्या सुमारास त्यांचे काम आटपुन घरी आले असता दुपारी १२-०० वाजण्याच्या सुमारास मध्यांतर झाल्या वर मुलगा बाळू हा जेवणा साठी घरी येत असे पण तो घरी जेवणासाठी आला नसल्याचे संतोष गायकवाड यांनादिसल्याने त्यांनी आजूबाजूला राहणाऱ्या मुलांनाविचारले की बाळू आज घरी का आला नाही असे विचारले तेव्हा मुले म्हणाले की काही माहीत नाही असे म्हणल्याने संतोष गायकवाड हे १-३० वाजण्याच्या सुमारास त्यांचा मुलगा बाळू यास पाहण्यासाठी शाळेकडे गेले असता तो त्यांना पांडुरंग भाऊराव जोगदंड यांच्या घरासमोर त्यांचा मुलगा बाळू यास झाडाला एका पटकराने त्याचे पाय व हात बांधून ठेवलेला दिसला तेंव्हा किराणा दुकानावर असलेल्या कविता पांडुरंग जोगदंड ह्या संतोष गायकवाड यांना पाहून म्हणाल्या की तुझा मुलगा चोरटा आहे. त्याने माझ्या दुकानातील चॉकलेट चोरून घेतले त्यामुळे मी त्यास झाडाला बांधून ठेवले आहे.तेव्हा संतोष गायकवाड हे त्या महिलेचे पती पांडुरंग भाऊराव जोगदंड यांचा मुलगा गोपाळ पांडुरंग जोगदंड यांना म्हणाले की हे बरोबर नाही असे म्हणताच पांडुरंग जोगदंड म्हणाले की तुला काय करायचे ते कर माझ्या बरोबर काय ते तूआम्हाला शिकवणार का? असे म्हणाले तसेच गोपाळ जोगदंड हा देखील त्यांच्या वडिलाप्रमाणेच संतोष गायकवाड यांना बोलू लागला.संतोष गायकवाड यांचा मुलगा बाळू याचे बांधलेले हातपाय सोडले व ते मुलाला घेऊन तिथून निघून आले.संतोष गायकवाड यांनी बाळूयास विचारले असता त्यांनी सांगितले की शाळेतून मध्यांतर नंतर घराकडे  येत असताना कविता जोगदंड यांनी त्याला चॉकलेट का घेतो असे म्हणून बळजबरीने धरून त्याचे हात पाय झाडाला बांधून ठेवले.बाळूरडायला लागल्यावर त्यालारडलास तर अजून मारेल असे म्हणून त्याच्या पाठीत चापटाने मारले त्याने कविता जोगदंड यांना पिण्यासाठी पाणी मागितले तरी कविता जोगदंड व तिचे पती व मुलाने बाळूला पाणी दिले नाही अशी हकीगत बाळू ने त्याच्या वडिलाला सांगितली.तसेच सदर घटना पाहिल्याचे माझ्या गावातील विनोद उत्तम गायकवाड यांनी देखील मला सांगितले.आम्ही महार जातीचे आहोत हे माहीत असून जाणून - बुजून कविता पांडुरंग जोगदंड यांनी माझा मुलगा बाळू यास यांनी त्यांच्या दुकानातून चॉकलेट घेतल्याच्या संशया वरून माझ्या मुलास त्यांच्या घरासमोर सार्वजनिक ठिकाणी अंगणात सर्व लोकांना दिसेल अशा पद्धतीने त्याचे हात पाय बांधून मुलगा रडला तर त्यास पाठीत मारून तसेच पुन्हा रडल्यास मारण्याची धमकी देऊन त्या सुमारे दीड तास उन्हात झाडाला बांधून ठेवले.सदरठिकाणी गेल्यावर कविता जोगदंड, पांडुरंग जोगदंड व गोपाळ जोगदंड यांनी मला महारड्या असे बोलून माझ्या जातीवरून माझा व्देष करीत अपमान केला आहे.म्हणून दिनांक २९ ऑगस्ट २०२४ रोजी  त्यांचा मुलगा बाळू व त्यांची पत्नी संतोषी यांना घेऊन पोलीस स्टेशन केज येथे येऊन संतोष गायकवाड यांच्या तक्रारी वरून कविता पांडुरंग जोगदंड,पांडुरंग भाऊराव जोगदंड व गोपाळ पांडुरंग जोगदंड सर्व रा.येवता ता. केज जि.बीड यांच्या विरुद्ध गु.र.नं०४६५/ २०२४ भारतीय न्याय संहिता (बी एन एस), २०२३ ११५(२),३५१(२), ३५१(३), ३(५),अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती(अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम,१९८९ ३(१) (r), ३(१) (s) अनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर घटनेचा पुढीलतपास सहाय्यकपोलीसअधीक्षक कमलेश मीना हे करत आहेत.

Post a Comment

0 Comments