Type Here to Get Search Results !

चिंचोलीमाळी येथील सुपुञ अॕड.सुभाष राऊत यांची महाराष्ट्र राज्य अन्न आयोगाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने आनंदोत्सव साजरा.

 चिंचोलीमाळी येथील सुपुञ अॕड.सुभाष राऊत यांची महाराष्ट्र राज्य अन्न आयोगाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने आनंदोत्सव साजरा.



केज /प्रतिनिधी 


केज तालुक्यातील 

चिंचोलीमाळी येथील  सुपुत्र ॲड.सुभाष भाऊ राऊत यांची महाराष्ट्र राज्य अन्न आयोगाच्या अध्यक्ष पदी निवड झाली यामुळे  गावात राम राऊत मेजर यांच्या माध्यमातुन आनंद उत्सव साजरा करण्यात आला.यावेळी भाजपाचे जेष्ठ नेते सुनील आबा गलांडे पाटील,सरपंच सुनिल देशमुख,अभिजीत राऊत,माजी पंचायत समिती सदस्य नारायण शिंदे,ग्राम पंचायत सदस्य बालाजी राऊत,अशोक शिंदे,माणिक गालफाडे, उपसरपंच धिरज वणवे, दगडु दळवी,राजाभाऊ भुजबळ,माजी चेअरमन राम नखाते,आयुब पठाण, वसंत काळे,मालोजी नाना गलांडे व गावातील शेकडो समाज बांधव व समस्त गावकरी यांनी श्री संत सावता महाराज,श्री संत नामदेव महाराज यांच्या मंदिरात नारळाचे तोरण बांधून व श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकात पुष्पहार अर्पण करुन वफटाक्यांची आतिषबाजी करून एकमेकांना पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला त्यावेळी राम राऊत मेजर यांनी ओबीसी समाजाचे दैवत ना.छगन भुजबळ साहेबांचे व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचे व उपमुख्यमंञी देवेंद्र फडणवीस साहेब व उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचे आभार व्यक्त करून सुभाष भाऊंच्या कार्याचा गौरव करण्यात आला व चिंचोलीमाळीला लाल दिवा मिळाला अशा शब्दात मनोगत व्यक्त केले.यावेळी गावकरी मोठ्या संख्येने उपस्थीत होते.

Post a Comment

0 Comments