Type Here to Get Search Results !

मनोज जरांगे पाटलांच्या मातोरी या जन्मगावी खा.बजरंग सोनावणेंची पेढे तुला माझ्या आयुष्या तील ही पहिलीच पेढे तुला- -खा.बजरंग सोनवणे

 मनोज जरांगे पाटलांच्या       मातोरी या जन्मगावी

खा.बजरंग सोनावणेंची पेढे तुला

माझ्या आयुष्या तील ही पहिलीच पेढे तुला-

-खा.बजरंग सोनवणे



बीड/प्रतिनिधी


माझ्या आत्तापर्यंतच्या राजकीय कारकिर्दीत अनेक सत्कार सोहळे झाले.परंतू माझ्याआयुष्या तील ही पहीली पेढे तुला सत्कार पहिल्यांदाच होतो आहे.तुमचे प्रेम आणि माझ्यावरअसलेलाविश्वासपाहून मी भारावुन गेलो आहे.कारण मराठा आरक्षणाचे नेते,साक्षात मनोज जरांगे पाटील यांच्या जन्मगावी हा नवस आणि सत्कार होतो आहे. त्यामुळे आपण धन्यझालो आहोत.असे भावनिक उदगार खा.बजरंग सोनवणे यांनी व्यक्त केले. बीड लोकसभा निवडणूकीत,शेतकरी पुत्र बजरंग सोनवणे खासदार व्हावेत.असा नवस मातोरी ग्रामस्थांनी केला होता. त्यांचा नवस पूर्ण झाला, त्यामुळे खा.बजरंग सोनवणे विजयी झाल्या नंतर मनोज जरांगे पाटील यांच्या मूळगावी मातोरी गावात सोमवार दि.१९ आॕगष्ट रोजी  खा.बजरंग सोनवणे यांची पेढे तुला करुन ग्रामस्थांना त्याचे वाटप करण्यात आले. त्यावेळी ग्रामस्थांचे ऋण व्यक्त करतांना खा.बजरंग सोनवणे बोलत होते.पुढे बोलतांना खा.बजरंग सोनवणे म्हणाले की,बीड लोकसभा निवडणुकीत निवडून आल्यानंतर पेढे तुला करू असा नवस मातोरी येथील आसाराम जरांगे यांनी केला होता. हा नवस पूर्ण झाल्यानंतर आज श्रावणातीलतिसऱ्या सोमवारी भालकेश्वर संस्थान महादेव मंदिरात पेढे तुला करण्यात आली. खरंतर आपल्या सर्वांची असलेली सोबत आणि विश्वास यामुळे आपण खासदार झालो.येणाऱ्या काळात सर्वांच्या प्रश्नां साठी व जिल्ह्याचाविकास करण्यासाठी आपण केंद्रात आवाज उठवित राहणार आहोत असा शब्द यावेळी खा.बजरंग सोनवणे यांनी मातोरी ग्रामस्थांना दिला.यावेळी माजी मंत्री बदामराव पंडित,मेहबूब शेख,पुजा मोरे,संपादक विजयकुमार वाव्हळ यांच्यासह ईतर मान्यवर आदींची उपस्थिती होती.

Post a Comment

0 Comments