Type Here to Get Search Results !

महावितरण कार्यालयात समीर देशपांडे यांचा निरोप समारंभ संपन्न बीड येथे कार्यकारी अभियंता म्हणून पदोन्नती.महावितरण हे एक कुटुंब आहे- देशपांडे.

महावितरण कार्यालयात समीर देशपांडे यांचा निरोप समारंभ संपन्न 

बीड येथे कार्यकारी अभियंता म्हणून पदोन्नती.

महावितरण हे एक कुटुंब आहे- देशपांडे.

केज / प्रतिनिधी 

दि.o६रोजी केज येथील महावितरण उप विभागीय कार्यालयाचे उप कार्यकारी अभियंता,समीर देशपांडे यांना पदोन्नती बढती मिळाली असल्याने ते बीड येथे अतिरिक्त कार्यकारी अभियंता पदावर नव्याने रुजू झाल्याने त्यांना केज महावितरण कार्यालयातील सर्व कर्मचारी यांनी निरोप समारंभ देत त्यांचा हृदय सत्कार करण्यात आला सत्कारमूर्ती श्री. समीर देशपांडे हे भाऊक होऊन म्हणाले केज मध्ये एक वर्ष सेवा कशी झाली हे कळालेच नाही. सुरुवातीला बीडला रुजू व्हावे की नाही वाटत होते.आपण महावितरण मध्ये कायम काम करतो हे आपले सर्वांचे भाग्य आहे आपण लोकांच्या भावना ठेवून लोकांची कामे केली पाहिजेत,सर्वांनी एकजुटीने राहिले पाहिजे अनेक वेळा वेगवेगळ्या योजना राबवू शकलो,महावितरण हे एक कुटूंब आहे आणि तुम्हा सर्वांच्या सहकार्यामुळेच चांगले काम करण्याची संधी मिळाली,असे भावनिक उद्गागार देशपांडे यांनी काढले कार्यक्रमाचे अध्यक्ष साहाय्य अभियंता,महेश अंडील हे होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शंकर ठोंबरे यांनी केले. कार्यक्रमास सहाय्यक अभियंता वैभव चव्हाण,सहायक अभियंता शहाणे,गुत्तेदार वळसे पाटील, मागासवर्गीय संघटनेचे केज तालुका अध्यक्ष शिवाजी घुले, तसेच कर्मचारी नांदवे, सोनवणे, चाळक,काळे,बारगजे,तेलंग, नाईकवाडे,इत्यादी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments