Type Here to Get Search Results !

यश कन्ट्रक्शनच्या आडमुठ्या धोरणामुळे व बांधकाम विभागाच्या निष्काळजी पणामुळे स्थानिक नागरिकांसह वाहन चालक त्रस्त यश कंट्रक्शनला नेमके अभय कोणाचे ?-नागरिकांचा सवाल मंगळवारी आंदोलन करण्याचा क्रांती नगर येथील नागरिकांचा प्रशासनास इशारा.


 यश कन्ट्रक्शनच्या आडमुठ्या धोरणामुळे व बांधकाम विभागाच्या निष्काळजी पणामुळे स्थानिक नागरिकांसह वाहन चालक त्रस्त

 यश कंट्रक्शनला नेमके अभय कोणाचे ?-नागरिकांचा सवाल

मंगळवारी आंदोलन करण्याचा क्रांती नगर येथील नागरिकांचा प्रशासनास इशारा.



केज/प्रतिनिधी


यश कन्ट्रक्शनच्या आडमुठ्या धोरणामुळे व बांधकाम विभागाच्या निष्काळजी पणामुळे स्थानिक नागरिकांसह वाहन चालक त्रस्त झाले आहेत.यश कंट्रक्शनला नेमके अभय कोणाचे आहे? असा सवाल स्थानिक नागरिकासह प्रवाशांमधून उपस्थित केला जात आहे.दि.२७ आॕगष्ट २०२४ मंगळवार रोजी आंदोलन करण्याचा क्रांती नगर येथील नागरिकांनी प्रशासनास लेखी निवेदनाद्वारे इशारा दिला आहे.याबाबतची सविस्तर माहिती अशीकी, केज शहरातून कानडी माळी सह ग्रामीण भागात जाणाऱ्या रस्त्याचे काम हे सहा महिन्यापासून यश कंट्रक्शन करत आहे. केज -कानडी माळी हा रस्ता कोकीसपिर,क्रांतीनगर ते क्रांतीनगर येथील सार्वजनिक स्मशानभूमी पर्यंत गेल्या सहा महिन्या पासून काम चालू आहे. 

तसेच नाली बांधकाम काही ठिकाणी पूर्णझाल्या मुळे एक महिन्यापासून सर्व जुना डांबरी रस्ता खोदून ठेवल्यामुळे व सदर रस्त्याच्या खोदकामामुळे अनेक ठिकाणी केज नगरपंचायतची व धनेगाव ची पाईपलाईन फुटल्या मुळे गेले तीन महिन्या पासून येथील रहिवासी नागरिकांना पिण्याचेपाणी नाही.सध्या पावसाळा चालू आहे दररोजच्या पावसामुळे सर्व रस्त्यावर चिखल,गाळ झाल्यामुळे दररोज ५० ते ६० मोटर सायकल स्लीप होऊन  नागरिक पडत आहेत. यामध्ये महिला,मुली-मुले वयोवृद्ध नागरिक यांचे प्रमाण अधिक आहे.काही ठिकाणी जुने लाईटचेपोल काढून नवे पोल बसविले आहेत तर काही ठिकाणी जुने तसेच आहेत.येत्या तीन दिवसात सदर रस्त्याचे बंद असलेले काम तात्काळ सुरू करण्यात  यावे अशी लेखी निवेदना द्वारे केज तहसीलदार यांच्याकडे मागणी केली आहे.अन्यथा मंगळवार दिनांक २७ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी १०-०० वाजता हनुमान मंदिरासमोर क्रांतीनगर येथील कानडी रोड येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा येथील नागरिकांनी तहसीलदार केज यांना लेखी निवेदनाद्वारे इशारा दिला आहे.आमच्या प्रतिनिधीशी बोलताना येथील स्थानिक नागरिक म्हणाले की,गेले अनेक दिवसापासून सदर रस्त्याच्या कामाच्या अनुषंगाने यश कंट्रक्शनचे इंजिनिअर व कर्मचारी आणि सार्वजनिक बांधकाम उपविभाग,केज यांना वेळोवेळी तक्रार करून व भेटून देखील आमच्या कामाची कसल्याच प्रकारची दखल घेतली नाही घ्या उलट आम्हाला उडवाउडवीची उत्तरे देत आहेत तसेच काही ठिकाणी नालीचे काम झाले आहे परंतु बऱ्याचशा ठिकाणी नालीला पूर्णपणे तडे गेले आहेत त्यामुळे सदर काम निकृष्ट दर्जाचे होत असताना देखील लोक प्रतिनिधी व बांधकाम विभाग डोळेझाकपणा करत आहे असाही नागरिकांनी आरोप केला आहे.पुढे बोलताना ते म्हणाले की,सदर रस्त्याचे नालीचे काम अनेक ठिकाणी केले असून काही ठिकाणी गल्लीतील येणाऱ्या रस्त्यापर्यंत नालीचे काम केले आहे गल्लीतील येणाऱ्या रस्त्याला नालीचे काम जोडलेले नसल्यामुळे पावसाचे पाणी व सदर नालीचे पाणी रस्त्यावरून येत असल्यामुळे या भागा तील रहिवासी नागरिकांना व या रस्त्यावरून जाणाऱ्या येणाऱ्याग्रामीण भागातील वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.यश कंसट्रक्शन व सार्वजनिक बांधकाम विभागाशी अनेक वेळा नागरिकांनी तक्रार करून त्यांना भेटून संपर्क साधला तरी देखील ते जाणीवपूर्वक टाळाटाळ करत आहेत तसेच यश कंसट्रक्शनच्या आडमुढ्या धोरणामुळे व बांधकाम विभागाच्या निष्काळजी पणामुळे नाहक त्रास होत आहे.सदरचे काम हे आमदार फंडातून आलेले आहे या कामाकडे आमदार नमिता मुंदडा यांचेही देखील लक्ष नाही. लोकप्रतिनिधी हे स्वतःची टक्केवारी घेऊन गप्प बसत आहेत असा आरोप सामाजिक कार्यकर्ते श्री. बाबुराव गालफाडे यांनी केला आहे.पुढे बोलताना गालफाडे म्हणाले की, सदर रस्त्याचे काम करत असताना पाण्याची पाईप लाईन फुटली अथवा ना दुरुस्त झाली तर ती दुरुस्त करण्याची जबाबदारी ही यश कंट्रक्शनची असताना ते टाळाटाळ करत आहेत. त्या अनुषंगाने आम्ही बांधकाम विभागाशीसंपर्क केला ते तोंडीच म्हणतात आम्ही सदर कंट्रक्शनला पाईपलाईनचे काम करायला सांगतो परंतु अद्यापही पाईपलाईनचे काम पूर्ण झाले नाही.या यश कंट्रक्शनला नेमके  अभय कोणाचे आहे? व त्यांना कोण पाठीशी घालत आहे असाही बाबुराव गालफाडे यांनी सवाल उपस्थित केला आहे.या लेखी निवेदनावर बाबुराव गालफाडे,माजी नगरसेवक लक्ष्मणराव जाधव,सामाजिक कार्यकर्ते शकीलभाई सय्यद,शरदचंद्र पवार राष्ट्रवादी पक्षाच्या महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष सौ.शितलताई लांडगे,

सौ.हिरकणीताई गायकवाड,संतोष शेलार यांच्यासह २६ जणांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Post a Comment

0 Comments