Type Here to Get Search Results !

वसुंधरा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पैठण (सा) येथे लोकमान्य टीळक पुण्यतिथी व लोक शाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात संपन्न.

 वसुंधरा माध्यमिक व उच्च  माध्यमिक विद्यालय पैठण (सा) येथे लोकमान्य टीळक पुण्यतिथी व लोक शाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात संपन्न.



केज /प्रतिनिधी 


कै भुजंगराव सेवा प्रतिष्ठाण सारणी (आ) संचलित वसुंधरा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पैठण ( सा ) येथे लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात संपन्न झाली.या विद्यालयाचे प्राचार्य  गायकवाड एस.पी यांच्या हस्ते प्रतिमेचे पुजन करण्यात आले.याप्रसंगी उपमुख्याध्यापक चौधरी ए.एन.तसेच अनेक विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले तर संगित विषयाचे प्रा.प्रसाद कुलकर्णी यांनी लोक शाहीर अण्णाभाऊ साठे लिखित "माझी मैना गावाकडं राहिली ' लावणी चे उत्तम गायन केले या गिताने संयुक्तमहाराष्ट्राच्या चळवळीचे हुबेहुब चित्र विद्यार्थ्यांच्या समोर उभा केले.मुलांमध्ये प्रचंड उत्साह संचारला होता. अध्यक्षीय समारोप करताना विद्यालयाचे प्राचार्य गायकवाड एस.पी  यांनी लोकशाहीर आण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांच्या  कार्याविषयी माहिती दिली  त्यांच्या कार्याचा सर्वांनी आदर्श घ्यावा असे ते म्हणाले.तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता दहावी तील विद्यार्थी चि.चौधरी सुरज रमेश याने केले तर कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन इयत्ता नववीतील विद्यार्थ्यानी कु.चौधरी सानिका दिलीप हीने केले यावेळी प्राध्यापक, प्राध्यापिका,शिक्षक, शिक्षीका,शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.या कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.

Post a Comment

0 Comments