Type Here to Get Search Results !

मुलींनो गुड टच बॅड टच ओळखा समुपदेशक श्रीमती सीता गिरी यांचे विद्यार्थीनींना आवाहन.

 मुलींनो गुड टच बॅड टच ओळखा समुपदेशक श्रीमती सीता गिरी यांचे विद्यार्थीनींना आवाहन.



केज/प्रतिनिधी


साने गुरुजी निवासी प्रा. मा.उच्च मा.विद्यालयात दिनांक २६ आॕगष्ट २०२४ रोजी किशोरवयीन मुलीं साठी वैयक्तिक स्वच्छता व आरोग्य या विषयावर मार्गदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.यात किशोरवयीन मुलींना मासिक पाळी त्याबद्दल घ्यावयाची दक्षता तसेच मासिक पाळी आल्यानंतर न लाजता आपल्या आईला,मैत्रिणीला सांगा काही त्रास असल्यास डॉक्टरांशी संपर्क साधा असाही सल्ला यावेळी त्यांनी दिला.स्वच्छता, वैयक्तिकस्वच्छता,दातांची निगा कशी राखावी? बॅड टच गुड टच कसा ओळखावा ? याविषयावर सखोल असे समुपदेशन व मार्गदर्शन केले.स्वतःचे संरक्षण स्वतः करायला शिका,आईला मैत्रीण बनवा,शाळेतल्या मॅडमशी संवाद साधा,मैत्रीण बनवा आलेल्या अडचणी विचारा अनोळखी व्यक्तीकडून काही खाऊ नका व त्यांच्या सोबत जाऊ नका असे आवाहनही यावेळी त्यांनी मुलींना केले.तसेच या कार्यक्रमाचे अध्यक्षा संकुलाच्या प्राचार्य गित्ते मॅडम यांनी देखील मुलींना सखोल मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुलकर्णी मॅडम यांनी केले तर नागरगोजे मॅडम यांनी आभार मानले.यावेळी वस्तीगृह अधीक्षक लहाने मॅडम व मोठ्या संख्येने विद्यार्थिनी यावेळी उपस्थित होत्या.

Post a Comment

0 Comments