Type Here to Get Search Results !

लव्हुरी ते कोठी,यमाई वस्ती रस्ता गुत्तेदाराने न केल्यामुळे केज तहसील कार्यालयात नागरिकांचा आत्मदहन करण्याचा प्रयत्न तहसीलदार सचिन देशपांडे व पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील यांच्या सक्रीयते मुळे आत्मदहन रोखण्यात यश.

 लव्हुरी ते कोठी,यमाई वस्ती रस्ता गुत्तेदाराने न केल्यामुळे केज तहसील कार्यालयात नागरिकांचा आत्मदहन करण्याचा प्रयत्न

तहसीलदार सचिन देशपांडे व पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील यांच्या सक्रीयते मुळे आत्मदहन रोखण्यात यश.



केज/ प्रतिनिधी


लव्हुरी ते कोठी यमाई वस्ती रस्ता गुत्तेदाराने दुरुस्त न केल्यामुळे केज तहसील कार्यालयात नागरिकांनी आत्मदहन करण्याचा केला प्रयत्न करण्यात आला परंतु

प्रभारी तहसीलदार सचिन देशपांडे यांच्या सक्रीयते मुळे सदर आत्मदहन रोखण्यात यश आले व वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा करून सदर रस्त्याची दुरुस्तीकरण्याचेआश्वासन प्रभारी तहसीलदार सचिन देशपांडे यांनी दिले आहे. 

या बाबतची सविस्तर माहिती अशी की,केज तालुक्यातील लव्हुरी येथे जलजीवन योजनेअंतर्गत पाण्याच्या पाईपलाईनचे काम करण्यात आले होते. 

सदर पाईपलाईनचे काम हे लव्हुरी ते कोठी यमाई वस्ती रस्त्यावर रस्त्याच्या मध्यभागी सदर काम करणाऱ्या गुत्तेदाराने खोदून पाईपलाईनचे काम केले होते.सदर रस्ता हा या वस्तीवरीलनागरिकांनी स्वखर्चाने केला होता परंतु सदर गुत्तेदार पाईपलाईन चे काम करत असताना या वस्तीवरीलनागरिकांनी गुत्तेदारास काम करण्यास अडवले असता गुत्तेदाराने त्या वेळेस तोंडी आश्वासन दिले होते की,सदर रस्त्यावर मी मुरूम टाकून रस्ता दुरुस्त करून देतो असे सांगितले होते.परंतु गेले अनेक दिवसापासून ग्रामपंचायत कार्यालय व सदरील वस्तीवरील नागरिक हे जलजीवन च्या श्रीमती साळवे मॅडम, गटविकास अधिकारी केज,तहसीलदार केज यांच्यासह संबंधित वरिष्ठ कार्यालयाकडे लेखीतक्रार करून पाठपुरावा करत आहेत परंतु अद्यापही सदरील रस्त्यावर मुरूम टाकून रस्त्याचे दुरुस्तीचे काम केले नाही.म्हणून दि. २८ ऑगस्ट २०२४ रोजी दुपारी नागरिकांनीतहसील कार्यालयाच्या प्रांगणामध्ये आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला असता केज तहसीलचे प्रभारी तहसील दार श्री.सचिन देशपांडे व पोलीस उपनिरीक्षक श्री. राजेश पाटील यांनी तत्पर तेने आंदोलकांना आत्मदहन करण्यापासून परावृत्त केले.सदर रस्त्याचे कामासाठी खासदार बजरंग सोनवणे यांनी देखील संबंधित कार्यालया स पत्र देऊन सदर रस्त्याचे तात्काळ काम करण्याची विनंती केली असता सदर कार्यालयाने खासदार बजरंग सोनवणे यांच्याही पत्राची दखल घेतली नाही असे संबंधित नागरिक यांनी आमच्या प्रतिनिधी शी बोलताना म्हटले आहे. पुढे बोलताना नागरिक म्हणाले की,संबंधित गुत्तेदार व संबंधित कार्यालयाचे अधिकारी आणि लोकप्रतिनिधी हे संगनमत करून जाणीव पूर्वक आमच्या रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामासाठी टाळाटाळ करत आहेत असा आरोप देखील केला आहे.सदर गुत्तेदार हा शासनाचे आदेश पाळत नाही म्हणजे तो शासना पेक्षा वरिष्ठ आहे का काय                असा यावेळी नागरिकांनी सवाल उपस्थित केला. तसेच वरिष्ठ कार्यालयाने व संबंधित कर्मचारी यांनी सदर रस्त्याची पाहणी करून पंचनामा करून संबंधित गुत्तेदाराला पत्र देऊन सदर रस्त्याचे काम करण्याचे आदेश दिले असताना देखील सदर गुत्तेदार जाणीवपूर्वक काम करत नाही या गुत्तेदारास त्या कार्यालयाचा व लोक प्रतिनिधीचा पाठिंबा असल्याचा आरोप देखील नागरिकांनी केला आहे.

Post a Comment

0 Comments