Type Here to Get Search Results !

डॉ.संतोष काशिद यांना उत्कृष्ट प्रबंध लेखनाचा पुरस्कार.

 डॉ.संतोष काशिद यांना उत्कृष्ट प्रबंध लेखनाचा पुरस्कार.



 केज/प्रतिनिधी


संघवी केशरी महा विद्यालयातील मराठी विभागाचे प्राध्यापक डॉ. संतोष काशिद यांना अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था(नाशिक)पुणे केंद्र यांच्या वतीने दिला जाणारा उत्कृष्ट प्रबंध लेखनाचा आणि संशोधनाचा शैक्षणिक वर्ष २०२३-२४ चा मराठी संस्कृतीचा पुरस्कार,रुपये ५००० आणि सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले .

हा पुरस्कार टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे उपाध्यक्ष मा.डॉ.रोहित  टिळक यांच्या हस्ते पुणे येथे प्रदान करण्यात आला.याप्रसंगी अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेचे सर्व पदाधिकारी,सावित्री बाई फुले पुणेविद्यापीठाचे मराठी विभाग प्रमुख डॉ. तुकाराम रोंगटे आणि संघवी केशरी महा विद्यालयातील मराठी विभाग प्रमुख प्रा.प्रवीण जावीर हे उपस्थित होते. या यशाबद्दल महा विद्यालया तर्फे महा विद्यालयातील सर्व प्राध्यापक,प्राचार्य व संस्थेच्या पदाधिकाऱ्यां कडून त्याचे अभिनंदन करण्यात आले तसेच पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

Post a Comment

0 Comments