Type Here to Get Search Results !

कोरेगाव येथे कायदे विषयक जनजागरण शिबीर संपन्न.

 कोरेगाव येथे कायदे विषयक जनजागरण शिबीर संपन्न.



केज /प्रतिनिधी 


तालुका विधी सेवा समिती व वकील संघ केज यांच्या संयुक्त विद्यमाने कायदे विषयक जनजागृती शिबीराचे आयोजन दि.२१ आॕगष्ट २०२४ बुधवार रोजी सकाळी ०९-०० वाजता करण्यात आले.या

कार्यकमाच्या अध्यक्षपदी केज न्यायालयाचे दुसरे सह दिवाणी न्यायाधीश श्री.पी.व्ही.पाटील होते. कार्यक्रमास वकील संघाचे अध्यक्ष श्री.एम.एस.लाड, सहायक गटविकास अधिकारी श्री.ए.एस. राठोड,गटशिक्षणाधिकारी श्री.लक्ष्मणराव बेडसकर, अधिक्षक श्री.नन्नवरे सर, विधीज्ञ सर्वश्री.ई.जे. तांदळे,व्ही.ई.तांदळे, डी.आर.घुले,एस.आर.मोरे,बी.एल.यादव,अँड.जे.जी.बारगजे,कोरेगावचेसरपंच,ग्रामसेवक यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी दुसरे सहदिवाणी न्यायाधीश श्री.पी.व्ही. पाटील,अध्यक्ष श्री.एम. एस.लाड व मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपन करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली.यावेळी आपल्या प्रास्ताविकात ज्येष्ठ विधिज्ञ श्री.डी.टी. सपाटे यांनी पीडितभरपाई योजनेबद्दल माहिती सांगितली.श्री.एस.एन. मुंडे यांनी गरीबी निर्मूलन योजनेची प्रभावी अंमल बजावणी याबाबत विस्तृत अशी माहिती सांगितली. श्री.एस.आर.मोरे यांनी जागतिक आदिवासी दिवस याबाबत माहिती सांगितली.श्री.बी.एल. यादव यांनी स्ञीभ्रूण हत्या आणि इतर प्रचलित सामाजिक दुष्कृत्ये या बाबत सविस्तर अशी माहिती सांगितली.गट शिक्षणाधिकारी श्री.लक्ष्मणराव बेडसकर यांनी जातीभेद या विषया वर उपस्थितांना माहिती सांगितली.वकील संघाचे अध्यक्ष श्री.एम.एस.लाड यांनी हुंडा या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले.अध्यक्षीय समारोपात दुसरे सहदिवाणी न्यायाधीश श्री.पी.व्ही. पाटील यांनी उपरोक्त सर्व विषयांवर मार्गदर्शन केले.

कार्यकमाचे सुत्रसंचालन श्री.एस.व्ही.मिसळे यांनी केले तरआभार श्री.तांदळे यांनी मानले.कार्यकमास गावातील नागरिक, आदिवासींसह बहुसंख्येने लाभार्थी उपस्थित होते.

कार्यक्रमानंतर दुसरे सह दिवाणी न्यायाधीश श्री. पी.व्ही.पाटील,वकील संघाचेअध्यक्षश्री.एम.एस. लाड,गटशिक्षणाधिकारी श्री.लक्ष्मणराव बेडसकर, सहाय्यक गटविकास अधिकारी श्री.राठोड, तहसिल कार्यालयाचे अधिक्षक श्री.नन्नवरे व ज्येष्ठ विधिज्ञ यांनी आदिवासी वस्तीत जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली असता आदिवासींचे मुले शिक्षणापासून वंचित असल्याचे निदर्शनास आले.यावेळी सर्व मान्यवरांनी आदिवासीं सोबत चर्चा केली व याच वस्तीत लवकरात लवकर शिक्षणासाठी शाळा व एक शिक्षक देण्याचे ठरवण्यात आले.

Post a Comment

0 Comments