Type Here to Get Search Results !

केज शहरातील न्यू रॉयल इंग्लिश स्कूल मध्ये दहीहंडी उत्साहात साजरी

 केज शहरातील न्यू रॉयल इंग्लिश स्कूल मध्ये दहीहंडी उत्साहात साजरी 



केज/प्रतिनिधी

केज शहरातील न्यू रॉयल इंग्लिश स्कूल मध्ये पारंपरिक सण उत्सव मोठया उत्साहात साजरे केले जातात.यामुळे  विद्यार्थ्यांच्या शालेय जीवनात आपली संस्कृती परंपरेशी मुले जोडली जातात व शिक्षणासोबतच आपल्या परंपराचा आनंद मुलांना घेता येतो. वेगवेगळ्या उत्सवामुळे मुलांना आनंदमय वातावरणात शिक्षण देखील आनंदमय होऊन घेतले जाते.कृष्ण जन्म अष्टमी निमित्ताने मंगळवारी न्यू रॉयल इंग्लिश स्कूल मध्ये बाळ गोपाळानी दहीहंडीचे आयोजन केले होते. यावेळी मुलांनी कृष्ण व मुलींनी राधा ची वेशभूषा केली होती.लहान मुला मुलींनी आपल्या सुंदर वेशभूषांनी शाळेतील वातावरण भारावून गेले होते.शाळेत बांधलेल्या दहीहंडीला फोडून गोपाळ कालाचा आनंद लुटला यावेळी मुख्याध्यापिका  विजया जोगदंड गायकवाड,शिक्षिका स्वाती साबळे फुके, निकिता नवघरे रोडे व दत्ता बावरे सह बाल गोपाल उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments