Type Here to Get Search Results !

पैठण (सा)येथील वसुंधरा विद्यालयास प्र-कुलगुरू डॉ.वाल्मीक सरवदे यांची सदिच्छा भेट

 पैठण (सा)येथील वसुंधरा विद्यालयास प्र-कुलगुरू डॉ.वाल्मीक सरवदे यांची सदिच्छा भेट



केज/प्रतिनिधी


केज तालुक्यातील पैठण येथील वसुंधरा माध्यमिक व उच्च विद्यालयास डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे प्र कुलगुरू प्रा.डॉ.वाल्मीक सरवदे यांनी शुक्रवाररोजी सदिच्छा भेट दिली. यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक सुशील कुमार गायकवाड यांच्या हस्ते डॉ.वाल्मीक सरवदे व वैशाली सरवदे यांचा सपत्नीक सत्कारकरण्यात आला.डॉ.सरवदे यांनी  विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.यावेळी ते म्हणाले विद्यार्थ्यांना परिस्थितीची जाण ठेवून विद्यार्थ्यांनी सतत अभ्यासावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. प्रयत्नातून यश मिळते असे मत त्यांनी व्यक्त केले.कार्यक्रमाचे आभार श्री.चौधरी यांनी मानले यावेळी शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments