Type Here to Get Search Results !

आडस येथील कॉम्रेड काशिनाथ कापसे सर यांच्या पत्नी सौ.सुलोचना कापसे यांचे दुःखद निधन.

 आडस येथील कॉम्रेड काशिनाथ कापसे सर यांच्या पत्नी सौ.सुलोचना कापसे यांचे दुःखद निधन.



केज/प्रतिनिधी


आडस येथील योगेश्वरी नुतन प्राथमिक विद्यालया तील सेवानिवृत्त सह शिक्षिका सौ.सुलोचना काशिनाथ कापसे यांचे मंगळवारी दुपारी दुखःद निधन झाले.सौ.सुलोचना कापसे या कम्युनिस्ट पक्षा चे ज्येष्ठनेते कॉ.काशिनाथ कापसे यांच्या पत्नी असून त्या योगेश्वरी प्राथमिक शाळेतून एक विद्यार्थीप्रिय सहशिक्षिका म्हणून सेवा निवृत्त झाल्या होत्या. 

अलिकडे सौ.सुलोचना कापसे या वृध्दापकाळा तील विविध आजाराने त्रस्त होत्या.त्यांच्यावर लातुर,पुणे,मुंबई येथील खाजगी रुग्णालयात उपचार करण्यात आले मात्र औषधांना त्यांच्या प्रकृतीने फारसा प्रतिसाद दिला नव्हता.शेवटी अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असताना दि.१२ ऑगस्ट रोजी दुपारी १-३० वाजण्याच्या दरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला.एक कुटुंब वत्सल आई आणि विद्यार्थी प्रिय शिक्षिका म्हणून सौ.सुलोचना कापसे यांची ओळख होती.त्यांच्या अकाली निधनामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या पश्चात तीन मुली, दोन मुले,नातवंडे असा मोठा परिवार आहे.आडस येथील शेतात सायंकाळी  ५ - ०० वाजता त्यांच्या पार्थीवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.यावेळी मा.आ.पृथ्वीराज साठे, आर.टी.देशमुख, राजकिशोर मोदी, अण्णासाहेब पाटील कॉ. बब्रुवान पोटभरे,भाईमोहन गुंड,ॲड.नारायण गोले, आमीर साहेब यावेळी आगळे सर यांनीसामुहीक श्रद्धांजली वाहिली. यावेळी राजकीय, सामाजिक,शैक्षणिक क्षेत्रा मधील सर्व कापसेपरीवारा वर प्रेम करणारी मंडळी उपस्थित होती.

Post a Comment

0 Comments