Type Here to Get Search Results !

गणेश माध्यमिकविद्यालय तांबवा येथे मौखिक आरोग्य शिबीर संपन्न.

 गणेश माध्यमिकविद्यालय तांबवा येथे मौखिक आरोग्य शिबीर संपन्न.



केज /प्रतिनिधी 


केज उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.दत्तात्रय केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय मौखिक आरोग्य अभियान अंतर्गत गणेश माध्यमिक विद्यालय तांबवा येथे दंतरोग तज्ञ डाॕ.रमण दळवी यांनी  उपस्थित २०० पेक्षाजास्त विद्यार्थ्यांची मौखिक आरोग्य तपासणी करून त्यांच्यावर योग्य ते उपचार केले.या बाबत सविस्तर माहीती अशी की,केज उप जिल्हा रुग्णालयाचे वरिष्ठ दंतचिकित्सक डॉ.रमण दळवी उपस्थित विद्यार्थ्यांना दैनंदिन आरोग्य संबंधी काळजी घेण्यासाठी मार्गदर्शन केले  दिवसातुन दोन वेळा ब्रश करणे तसेच जंकफुड, चाॕकलेट अशा पदार्थाचे सेवन टाळावे असे सांगितले तसेच संतुलित आहाराचे महत्व समुपदेशक सीता गिरी यांनी सांगितले.यावेळी विद्यार्थ्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. यावेळी गणेश विद्यालयाचे  कर्मचारी उपस्थीत होते.या वेळी विद्यालयाच्या वतीने डाॕ.रमण दळवी व समुपदेशक सिता गिरी यांनी आभार मानले.

Post a Comment

0 Comments